Cannes 2023: हरियाणवी गायिका सपना चौधरीच कान्स फेस्टिव्हलमध्ये दिमाखात पदार्पण

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 20T134131.966

Sapna Choudhary: फ्रान्समध्ये (France) होणार्‍या कान्स फिल्म फेस्टिव्हला (Cannes Film Festival) बॉलीवूड स्टार्स (Bollywood Stars) अनेक वर्षांपासून हजेरी लावतात. (Sapna Choudhary at Cannes 2023) आता हरियाणवी सिंगर आणि बिग बॉस फेम सपना चौधरी ही देखील कान्स फिल्म फेस्टिव्हला हजेरी लावली आहे. यावेळी तिने इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान करुन या सोहळ्याला हजेरी लावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)


कान्स फिल्म फेस्टिव्हल अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा मानला जातो. सपना चौधरी हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. देशात आणि विदेशातही सपनाने तिच्या नावाचा मोठा डंका वाजवला आहे. त्यामुळे आज लोकप्रिय डान्सर म्हणून ती ओळखली जाते. सपनाच्या एका ठुमक्यावर अनेक जण घायाळ होतात. त्यामुळे अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटी, राजकीय व्यक्तींच्या घरी कोणताही कार्यक्रम असला की सपनाच्या डान्सला मोठी डिमांड असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Khushi Baliyan (@khushi_baliyan31)


इतकंच नाही तर तिच्या स्टेज शोलाही प्रेक्षक तुडूंब गर्दी करतात. मात्र, आपल्या नृत्यामुळे चाहत्यांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या सपनाचं एका तासाचं मानधन तुम्हाला माहितीये का? आजच्या घडीला लक्झरी लाइफमुळे चर्चेत येणाऱ्या सपनाचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. अनेकांनी सुरुवातीच्या काळात तिला दुषणं लावली. सतत टोमणे मारणे, हिनवणे असे प्रकार तिच्यासोबत घडले.

मात्र, या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत सपनाने कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं. आज सपनाला कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी अनेक जण वेटिंग लिस्टमध्ये असतात. त्यामुळेच सपना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते. एक काळ असा होता जेव्हा सपना एक स्टेज परफॉर्मन्ससाठी ३१०० रुपये मानधन घ्यायची. मात्र, आता ती एका तासासाठी चक्क लाखोंच्या घरात मानधन घेते.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

दरम्यान, एका मुलाखतीमध्येही तिने तिच्या मानधनाविषयी भाष्य केलं होतं. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सपनाच्या खांद्यावर आली होती. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून तिने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. परंतु, सुरुवातीच्या काळात काही हजारांची कमाई करणारी सपना आज एक तासासाठी चक्क २ ते ३ लाख रुपये मानधन घेते. तसंच ती अनेक म्युझिक अल्बममधूनही पैसे कमावते.

Tags

follow us