Download App

15 वर्षांची प्रतिक्षा संपली! WhatsApp अखेर iPad वर… ‘ही’ खास वैशिष्ट्ये

WhatsApp For Ipad Officially Launch Video Call Features : दीर्घ प्रतीक्षेनंतर व्हॉट्सॲप अखेर आयपॅडवर (WhatsApp For Ipad) आलंय. मेटाने आयपॅड वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप ॲपप लाँच केलंय. ते आता ॲपप स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे. आयपॅडसाठी बनवलेल्या या खास ॲपपमध्ये (WhatsApp) तुम्ही आयफोनवर वापरता ती सर्व वैशिष्ट्ये (WhatsApp Feature) आहेत. यासोबतच, त्यात काही अतिरिक्त वैशिष्ट्ये देखील आहेत. जी मोठ्या स्क्रीनच्या आयपॅडवर अधिक उपयुक्त बनवतात.

कोणती वैशिष्ट्ये आहेत?

एंड-टू-एंड एन्क्रिप्शनः तुमचे चॅट आणि कॉल नेहमीच सुरक्षित असतील.

ऐकावं ते नवलचं! लफडं बाहेर काढेल; शटडाऊन करायला सांगणाऱ्या इंजीनिअरला AI ची धमकी

व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल: तुम्ही आता iPad वर 32 लोकांपर्यंत व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करू शकता.

स्क्रीन शेअरिंगः तुम्ही कॉल दरम्यान तुमची स्क्रीन देखील शेअर करू शकता, जी ग्रुप डिस्कशन किंवा प्रेझेंटेशनसाठी खूप उपयुक्त ठरेल.

आयपॅड-विशिष्ट वैशिष्ट्येः मेटाने स्टेज मॅनेजर, स्लिट व्हयू आणि स्लाइड ओव्हर सपोर्ट यांसारखी काही आयपॅड-विशिष्ट वैशिष्ट्ये देखील जोडली आहेत. या वैशिष्ट्यांमुळे तुम्ही एकाच वेळी अनेक ऑप्स चालवू शकता. ही वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना वेब ब्राउझिंग करताना संदेश पाठवण्यास किंवा कॉलवर असताना ग्रुप ट्रिपसाठी शोध घेण्यास मदत करतात.

महाविकास आघाडी गेली खड्ड्यात! राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळे फासू…ठाकरे गटाच्या नेत्याने धमकावले

ॲपपल पेन्सिल आणि मॅजिक कीबोर्डसह कार्य: आयपॅडसाठी व्हॉट्सअॅप अॅपल पेन्सिल आणि मॅजिक कीबोर्डसह देखील कार्य करते. ज्यामुळे लेखन आणि टायपिंगचा अनुभव चांगला मिळतो.

मल्टी-डिव्हाइस तंत्रज्ञानः व्हॉट्सअॅपने नमूद केलंय की, ते अॅप मल्टी-डिव्हाइस तंत्रज्ञान वापरते. याचा अर्थ तुमचे चॅट्स, कॉल्स आणि मीडिया तुमच्या आयफोन, मॅक आणि इतर डिव्हाइसेसवर सिंक केलेले राहतील, तर सर्व प्लॅटफॉर्मवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन चालू राहील.

अॅप कसे डाउनलोड करावे?

आयपॅडसाठी व्हॉट्सअॅप आता अॅपल अॅप स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. डाउनलोड करणे खूप सोपे आहे.
पायरी 1: तुमच्या iPad वर अॅप स्टोअर उघडा.
पायरी 2: सर्च बारमध्ये ‘WhatsApp’ अॅप शोधा.
पायरी 3: डाउनलोड सुरू करण्यासाठी ‘मिळवा’ बटणावर टॅप करा आणि पुष्टी करा (जसे की तुमचा फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी).

हे अॅप आयपॅड वापरकर्त्यांसाठी एक मोठा दिलासा आहे, कारण आतापर्यंत त्यांना फक्त वेब ब्राउझरद्वारे व्हॉट्सअॅप वापरावे लागत होते, जे नेहमीच सोयीचे नव्हते. एका समर्पित अॅपच्या आगमनाने, मोठ्या स्क्रीनवर चॅटिंग, कॉलिंग आणि मीडिया शेअरिंग आता आणखी सोपे आणि सुरळीत होईल.

 

follow us