Download App

व्हॉट्सॲप आणणार जबरदस्त फीचर्स, स्टेटस करता येणार रिशेअर अन् फॉरवर्ड

WhatsApp Feature :  जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग साईट व्हॉट्सॲप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट आणणार आहे.

WhatsApp Feature :  जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग साईट व्हॉट्सॲप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट आणणार आहे. ज्याचा फायदा घेत युजर्स स्टेटस रिशेअर किंवा फॉरवर्ड करु शकणार आहे. इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) सारखे उत्तम फीचर्स देण्याचा प्रयत्न व्हॉट्सॲप करत आहे. त्यामुळे आता युजर्स व्हॉट्सॲप देखील स्टेटस रिशेअर किंवा फॉरवर्ड करु शकणार आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉइड 2.25.16.16 साठी बीटामध्ये नवीन अपडेटची चाचणी सुरु करण्यात आली आहे. WABetaInfo ने त्यांच्या  X हँडलवरील पोस्टमध्ये या फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही नवीन फीचर्स पाहू शकतात. माहितीनुसार, या फीचर्सचा फायदा घेत तुम्ही हे ठरवू शकतात की, तुम्ही पोस्ट केलेले स्टेटस शेअर करता येणार की नाही. सध्या जर एखाद्याने तुम्हाला स्टेटस मेशन केला तरच तुम्ही स्टेटस पाहू शकतात आणि शेअर करु शकतात. मात्र नवीन फीचर आल्यानंतर युजर्स त्यांचे स्टेटस सामन्यपणे देखील शेअर करू शकणार आहे.

व्हॉट्सॲपचे हे नवीन अपडेट इंस्टाग्राम स्टोरी शेअरिंग सारखे असणार आहे. नवीन अपडेटमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप वर एक टॉगल दिसेल. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्टेटसवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकाल. हे फीचर्स डीफॉल्टनुसार डिसेबल करण्यात येणार आहे. जर तुम्ही हे फीचर्स डिसेबल केले तरच तुमच्या संपर्क यादीतील इतर लोक तुमचे स्टेटस अपडेट शेअर करू शकतील.

अनुपम खेर यांच्यासह 78 व्या कान्स चित्रपट महोत्सवात बोमन इराणी करणार शानदार एंट्री

यामुळे तुमच्या गोपनीयतेला कोणताही धोका निर्माण होणार नाही. फक्त तुम्ही ज्या संपर्कांना परवानगी देता तेच स्टेटस  पाहू शकतील आणि फक्त तुमचे निवडलेले संपर्कच स्टेटस शेअर करतील.

follow us