Download App

सावधान! एक क्लिकमुळे होवू शकता कंगाल, ‘या’ WhatsApp Scam पासून सतर्क राहा…

WhatsApp Photo Scam Alert : सायबर फसवणुकीच्या (Cyber Crime) घटना झपाट्याने वाढत आहेत. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवीन युक्त्या वापरत राहतात. जगातील सर्वाधिक वापरली जाणारी वेबसाइट व्हॉट्सॲप (WhatsApp Photo) आता फसवणूक करणाऱ्यांसाठी एक नवीन ठिकाण बनलंय. गेल्या काही काळापासून व्हॉट्सॲपवर एक नवीन फोटो स्कॅम सुरू आहे. जो तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ अँड्रॉइड फोन वापरकर्तेच नाही तर आयफोन वापरकर्ते (Crime News) देखील व्हॉट्सॲप फोटो स्कॅमला बळी पडू शकतात. व्हॉट्सॲप स्कॅम हे सेल्स किंवा मोठ्या कार्यक्रमांदरम्यान सर्वात जास्त सक्रिय असतात, जेव्हा लोक ऑफर्सच्या मोहात पडू शकतात.

सरकारचा मोठा निर्णय, राज्यात सुरु होणार महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती पुरस्कार योजना

WhatsApp Scam कसं काम करतो?

स्कॅमर तुमच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून फोटो पाठवतात.
हे फोटो सामान्य दिसतात, पण त्यामध्ये मॅलवेअर कोड लपलेला असतो
तुम्ही अनोळखी नंबरवरून पाठवलेल्या फोटोवर क्लिक करताच, तुमच्या फोनमध्ये मॅलवेअर इन्स्टॉल होते, जे हॅकर्सना तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश देऊ शकते.
तुमच्या फोनवर मालवेअर हल्ला झाल्यानंतर, हे मालवेअर तुमचे बँकिंग अॅप्स आणि पासवर्ड चोरते, ते तुमची ओळख क्लोन देखील करू शकते.
काही अॅडव्हान्स स्कॅमर्स तुमच्या बँक खात्यातून पैसे देखील हस्तांतरित करू शकतात.
याचा अर्थ असा की तुमचे खाते फक्त एका क्लिकवर रिकामे होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात.

मास्टरस्ट्रोक ठरला तोट्याचा! भारताची विमानं बंद, पाकिस्तानला दररोज अडीच कोटींचा फटका

WhatsApp Scam पासून कसे वाचाल?

अनोळखी नंबरवरून पाठवलेल्या फोटोवर क्लिक करण्याची चूक करू नका.
व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये जा आणि ऑटो डाउनलोड फीचर बंद करा.
जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजबद्दल शंका असेल, तर तुम्ही पाठवणाऱ्याला ब्लॉक करू शकता आणि त्याची तक्रार करू शकता.

 

follow us