Red Sandalwood : भारतीय सोशल मीडियावर (Social Media) गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2: द रुल’ ची (Pushpa 2: The Rule) चर्चा जोराने सुरु आहे. फक्त भारतात नाहीतर संपूर्ण जगात या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. फक्त भारतात या चित्रपटाने 1000 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे तर संपूर्ण जगभरात 2000 कोटी पेक्षा जास्त पैसे कमावले आहे. पुष्पा 2: द रुल चित्रपट लाल चंदनाच्या तस्करी करणाऱ्या पुष्पावर आधारित आहे.
या चित्रपटामध्ये पुष्पा जंगलातून चंदनाच्या लाकडाची तस्करी कशी करतो आणि कोणत्या पद्धतीने जागतिक बाजारपेठेत विकतो हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे तुम्हाला हे माहिती आहे भारताच्या कोणत्या ठिकाणात कोट्यवधींना विकले जाणारे लाल चंदन आढळते आणि याची जागतिक बाजारपेठेत किंमत किती आहे?
एक किलोची किंमत 1-2 लाखांपर्यंत
माहितीनुसार, भारतातील आंध्र प्रदेशातील शेषचलम जंगलात उच्च दर्जाचे लाल चंदन आढळते. शेषचलम जंगल कडप्पा आणि तिरुपती जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. हे जंगल लाल चंदनाच्या तस्करीचा एक गड मानले जाते. या जंगलातून मिळणारे चंदन चीन, जपान आणि रशियासारख्या देशांमध्ये पाठवले जाते, जिथे याचा वापर औषधे आणि फर्निचर बनवण्यासाठी करण्यात येतो. माहितीनुसार, चंदनाची किंमत प्रति किलो 50 ते 70 हजार रुपयांपर्यंत असते पण जागतिक बाजारात एक किलो उच्च दर्जाच्या लाल चंदनाची किंमत 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत जाते.
तर दुसरीकडे वाढत असणारी तस्करी पूर्णपणे थांबवण्यासाठी सरकारने जंगलातील लाल चंदनाची झाडे तोडण्यास आणि त्यांची निर्यात करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. माहितीनुसार, शेषचलम जंगल 5 लाख हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे आणि या जंगलाचा बहुतेक भाग डोंगराळ आहे. याच भागात देशातील सर्वोत्तम दर्जाचे लाल चंदन आढळते. ज्याला रक्तचंदन किंवा लाल सोने असेही म्हणतात. हे लाल चंदन इतके दुर्मिळ आहे की या झाडांचे संरक्षण करण्यासाठी टास्क फोर्सचे कर्मचारी तैनात केले जातात आणि राज्यात चंदनाची झाडे तोडण्यास पूर्णपणे बंदी आहे. माहितीनुसार, तस्करी आणि इतर कारणांमुळे, या झाडांची संख्या आता 50 टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे.
विक्री चीन आणि जपानमध्ये
माहितीनुसार, काही वर्षांपूर्वीपर्यंत लाल चंदनाच्या लाकडापासून सुमारे 1200 टक्के नफा मिळत होता आणि हा नफा या लाकडाच्या नामशेष होण्याचे कारण बनला. जास्त नफा मिळविण्याच्या लोभापायी चंदन तस्कर दरवर्षी चेन्नई, तुतीकोरिन, मुंबई आणि कोलकाता बंदरांमधून नेपाळ आणि तिबेटमार्गे चिनी बाजारपेठेत 2000 टन लाल चंदन पोहोचवतात.
मोहरीच्या पेंडी, नारळाचे तंतू आणि मीठ यामध्ये लपवून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी करण्यात आली. हे थांबवण्याच्या मोहिमेत, 2015 मध्ये, अनेक तस्कर चकमकीत मारले गेले. हे थांबवण्यासाठी, तस्करीत सहभागी आढळल्यास 11 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. लाल चंदनमशेष होण्याच्या मार्गावर जंगलतोड, तस्करी आणि पीक लागवडीमुळे लाल चंदनाचे लाकूड नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
Delhi Elections Result: केजरीवाल अडचणीत? ACB ने बजावली नोटीस, विचारले ‘हे’ 5 प्रश्न
चंदनाचे झाड पूर्णपणे प्रौढ होण्यासाठी सुमारे 40-50 वर्षे लागतात, त्याउलट, नफा मिळविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे झाड तोडणे सुरूच असते. हे लाल चंदन आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच लाल चंदनाचा समावेश आययूसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) च्या यादीत करण्यात आला आहे जिथे त्याचे उत्पादन धोक्यात असलेल्या श्रेणीत टाकण्यात आले आहे.