फॅमिली प्लॅनिंगमध्ये अडथळे का येतात? जाणून घ्या कारणं…

family planning सध्याच्या काळात नव मातांना आणि होणाऱ्या मातांना हा आनंद न मिळू शकणार मागे मात्र एक आरोग्य समस्या आहे.

Family Planning 4

Family Planning 4

Why are there obstacles in family planning? Find out the reasons : बाळाचा पहिला रडण्याचा आवाज त्याचं पहिलं गोड हास्य, आई-बाबांचं बोट पकडून टाकलेलं पहिलं पाऊल या सगळ्या सुंदर गोष्टी सर्वच नव्याने आई-वडील झालेल्या आणि आई वडील होऊ इच्छिणाऱ्या दांपत्यांसाठी अत्यंत खास असतात. मात्र सध्याच्या काळात नव मातांना आणि होणाऱ्या मातांना हा आनंद न मिळू शकणार मागे मात्र एक आरोग्य समस्या आहे. मात्र यावर खुलेपणाने चर्चाच होत नाही काय आहे ही समस्या? जाणून घेऊ सविस्तर

पोरीसोबत इथं का बसला विचारले; संतापलेल्या तरुणांचा थेट मंदिराच्या विश्वस्तावर कोयत्याने हल्ला

पूर्वीच्या काळापेक्षा भारतामध्ये आता आई होताना बाळांतपणामध्ये उद्भवणाऱ्या विविध समस्या आता कमी झाल्या आहेत. 89% डिलिव्हरी आता हॉस्पिटलमध्ये होतात. मात्र नव्याने झालेल्या आईच्या मानसिक रित्या तेवढ्या सुरक्षित नसल्याचे आकडेवारी सांगते. कारण डिलिव्हरीनंतर भारतामध्ये तब्बल 22 टक्के महिला या गंभीर मानसिक आजारातून जातात. या आजाराला अनेक पैलू आहेत. कुठे प्रत्येक वेळी आनंदी राहण्याचा दबाव, कधी परफेक्ट आई बनण्याचा दबाव, तर कुठे डिलिव्हरीच्या वेदनांची भीती, तर कधी ब्रेस्ट फिडींग न करता येण्याचा पश्चाताप मात्र अनेक माता हा आजार लपवतात आणि त्या हळूहळू चिंता थकवा आणि इमोशनल डिस्कनेक्ट होतात.

डोंबिवलीत रंगला अनोखा बुक स्ट्रीट उपक्रम ; 9 हजारहून अधिक वाचक सहभागी

डिलिव्हरीनंतर येणारा बेबी ब्लुज सर्वसामान्य आहे. ज्यामध्ये थकवा, चिडचिड, झोप न येणे यांचा समावेश होतो. मात्र हे लक्षणं जास्त आठवडे राहिले तर हे लक्षणं पोस्ट पार्टम डिप्रेशनकडे घेऊन जाणारे ठरतात. यामध्ये डिलिव्हरी झालेली महिला ही एकाकी वाटून घ्यायला लागते. संवाद कमी करते. त्यामुळे हे सर्व लक्षणे दुर्लक्षित केल्यास आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकतात.

ST Gratuity Interest Scam : एसटी ग्रॅज्युइटी व्याज घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू

तर फक्त पोस्ट पार्टम डिप्रेशनच नाही तर फॅमिली प्लॅनिंगमध्ये अनेक अडथळे आहेत. आजकालच्या नवीन कपल्सच्या माता-पिता बनण्याचा मार्ग कठीण होत चालला आहे. ज्या मागे उशिरा विवाह होणे, त्यानंतर उशिरा फॅमिली प्लॅनिंग करणे, करिअरचा ताण, खराब लाईफस्टाईल, प्रदूषण आणि धावपळ या सर्वांचा परिणाम फर्टीलिटीवर होतो. यामध्ये महिलांमध्ये पीसीओडी आणि पीसीओएस, थायरॉईड, हार्मोनल इम्बॅलन्स वाढत आहे.

या रे या सारे या! बारामती निकालापूर्वी पुण्यात शरद पवारांचे ‘फॅमिली काऊन्सिलिंग; काय घडणार?

त्यामुळे आजच्या काळामध्ये फॅमिली प्लॅनिंगमध्ये अडथळा आणि फॅमिली प्लॅनिंग करताना येणाऱ्या समस्या या सर्व गोष्टींचे लाज बाळगण्यापेक्षा समस्यांचे निदान होणे गरजेचे आहे.याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका…

Exit mobile version