पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईडचा त्रास अधिक का आढळतो? जाणून घ्या कारणं

thyroid आजकाल अनेक घरांमध्ये सर्वाधिक ऐकू येणाऱ्या आरोग्य समस्यांपैकी थायरॉईड ही एक प्रमुख समस्या बनली आहे.

Thyroid

thyroid disorders more common in women than in men? Find out the reasons : आजकाल अनेक घरांमध्ये सर्वाधिक ऐकू येणाऱ्या आरोग्य समस्यांपैकी थायरॉईड ही एक प्रमुख समस्या बनली आहे. विशेष म्हणजे, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक आहे. अनेकजण थायरॉईडकडे केवळ वजन वाढणे किंवा अशक्तपणा यापुरतेच पाहतात. मात्र, प्रत्यक्षात थायरॉईडचा शरीरातील चयापचय, ऊर्जा निर्मिती आणि इतर अनेक महत्त्वाच्या कार्यांवर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे महिलांमध्ये हा आजार अधिक का आढळतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे जैविक आणि संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण अधिक का?

आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या Cadabams Diagnosticsच्या माहितीनुसार, प्रत्येक आठ महिलांपैकी एका महिलेला आयुष्यात कधीतरी थायरॉईडचा त्रास होण्याची शक्यता असते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा धोका पाच ते आठ पट अधिक असल्याचे मानले जाते. वाढत्या वयानुसार हा धोका आणखी वाढतो. अनेकदा सुरुवातीची लक्षणे स्पष्ट नसल्याने निदान होण्यास उशीर होतो.

​पुण्यात TCS चा भव्य जॉब फेअर; ६ जुलैला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह

थायरॉईड ही मानेच्या पुढील भागात असलेली फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीरातील चयापचय, ऊर्जा आणि वाढ नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करते. या हार्मोन्सचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझमसारख्या समस्या निर्माण होतात.

या समस्येमागील प्रमुख कारणे कोणती?

महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण वाढण्यामागे हार्मोन्समधील बदल आणि ऑटोइम्यून आजार ही दोन प्रमुख कारणे मानली जातात. महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन आणि रोगप्रतिकारक शक्ती पुरुषांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे महिलांमध्ये ऑटोइम्यून आजारांचे प्रमाण अधिक दिसून येते. अशा परिस्थितीत शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून थायरॉईड ग्रंथीवरच हल्ला करते. त्यामुळे हाशिमोटो थायरॉईडायटिस आणि ग्रेव्ह्स डिसीजसारख्या आजारांचा धोका वाढतो.

आयुष्यातील कोणत्या टप्प्यांमध्ये धोका वाढतो?

महिलांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये थायरॉईडचा धोका अधिक असतो. गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि रजोनिवृत्ती (मेनोपॉज) या काळात शरीरातील हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात. या बदलांचा परिणाम थायरॉईड ग्रंथीवर होऊ शकतो. त्यामुळे या काळात नियमित थायरॉईड तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

Food and Drug Administration : तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; 6 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित

थायरॉईडचा परिणाम केवळ वजन किंवा थकव्यापुरता मर्यादित राहत नाही. मासिक पाळी अनियमित होणे, गर्भधारणेत अडचणी येणे तसेच गर्भावस्थेत आई आणि बाळाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. वाढत्या वयात याची लक्षणे अनेकदा मेनोपॉजसारखी वाटत असल्याने निदान उशिरा होण्याची शक्यता असते.

कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत?

कोणतेही स्पष्ट कारण नसताना सतत थकवा जाणवणे, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे, वारंवार मूड बदलणे किंवा मानेवर सूज दिसणे अशी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन TSH, T3 आणि T4 या रक्त तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास थायरॉईडवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते आणि भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते.

 

follow us