Food and Drug Administration : तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; 6 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित
Food and Drug Administration : अन्न व औषध विभागाने पुन्हा एकदा राज्यात मोठी कारवाई करत संभाजीनगर आणि ठाणे विभागातील एकूण 6 अन्न
Food and Drug Administration : अन्न व औषध विभागाने पुन्हा एकदा राज्यात मोठी कारवाई करत संभाजीनगर आणि ठाणे विभागातील एकूण 6 अन्न व्यवसयिकांचे परवाने निलंबित केले आहे. या कारवाई दरम्यान अन्न व औषधे विभागाने 28 धाडी टाकल्या आहेत. यात 25 लाख 84 हजार 402 रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला, गुटखा व इतर अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आहे. तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री, वितरण आणि वाहतुकीप्रकरणी 24 जणांना अटक करण्यात आली असून 11 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. याचबरोबर एक वाहनही जप्त करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषधे विभागाने दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर (Sambhajinagar) विभागातील दोन आणि ठाणे (Thane) विभागातील चार हॉटेल/रेस्टॉरंट्सवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित व्यावसायिकांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी अन्न व औषधे विभागाचे कार्यभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्यात अन्न व औषधे विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून भेसळयुक्त माल जप्त करण्यात येत आहे आणि आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल/रेस्टॉरंटची नावे
हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंट – सीबीडी बेलापूर, नवी मुंबई
साई सागर विस्तारित कक्ष-83 – तुर्भे, नवी मुंबई
हॉटेल नाना-नानी – वाशी, नवी मुंबई
एस्प्रेसो एंटरटेन्मेंट अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. – वाशी, नवी मुंबई
हॉटेल आईचं गावठाण – इटखेडा, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर
यल्ला यल्ला – सिस्को चौक, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर
राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबतचा तपशील समोर-
हॉटेल/रेस्टॉरंटवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 32(3) व एफएसएस 2011 मधील 2.1.8(4) अन्वयेनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.