राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबतचा तपशील समोर
Ram Mandir Donation Theft : अयोध्यातील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. या प्रकरणामुळे विरोधक मोदी सरकारवर
Ram Mandir Donation Theft : अयोध्यातील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. या प्रकरणामुळे विरोधक मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी करावाई करत आठ जणांना अटक केली आहे. अविनाश शुक्ला, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, रमाकांत मिश्रा, करुणेश पांडे, रामाशंकर यादव (उर्फ टिन्टू यादव) आणि मनीष यादव (टिन्टूचा पुतण्या) या आरोपींना अटक केली आहे. सोमवारी न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा या आरोपींच्या घरांवर छापे टाकले आहे.
तपासादरम्यान, अयोध्या पोलिसांनी विविध आरोपींकडून रोख रक्कम, अमेरिकन डॉलर्स आणि दागिने जप्त केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आठपैकी सात आरोपींनी (Ram Mandir Donation Theft) चौकशीदरम्यान कबूल केले की, मंदिरातील देणगीची मोजणी सुरू असताना ही रक्कम चोरली किंवा स्वतःकडे ठेवली होती. तसेच, पोलिसांचा हस्तक्षेप होण्यापूर्वीच ट्रस्टने आरोपींकडून काही रोख रक्कम परत मिळवली होती, हे देखील उघड झाले आहे. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील एसआयटी (SIT) आपला अंतिम अहवाल 10 जुलै नंतर सादर करू शकते.
अविनाश शुक्लाकडून 20 लाख रुपये हस्तगत
वृत्तानुसार, सर्वात मोठी रक्कम अविनाश शुक्ला याच्याकडून हस्तगत करण्यात आली. मंगळवारी पोलिसांनी तुरुंगात त्याची तीन तासांहून अधिक काळ चौकशी केली. चौकशीदरम्यान, त्याने देणगीच्या रकमेची चोरी आणि अपहार केल्याची कबुली दिली आणि उर्वरित रक्कम ट्रस्टला परत करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रस्टच्या वतीने त्याने स्वतःकडे ठेवलेली रोख रक्कम हस्तगत केली. अविनाश शुक्ला याच्याकडून एकूण 20,39,220 रुपये जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त, 1,121 अमेरिकन डॉलर्स, चांदीसारख्या धातूपासून बनलेली एक वस्तू, दोन साखळ्या आणि एक अंगठी जप्त करण्यात आली.
मुंबईनंतर पुण्यात भररस्त्यात कोसळलं झाड; थोडक्यात बचावली तरुणी-
अनुकल्प मिश्राकडून 16 लाख रुपये हस्तगत
26 जून रोजी झालेल्या चौकशीदरम्यान, दुसरा आरोपी अनुकल्प मिश्रा याने देणगीची रक्कम मोजताना पैसे चोरल्याची आणि अपहार केल्याची कबुली दिली. तसेच, त्याने ती रक्कम ट्रस्टला परत करण्याची तयारीही दर्शवली. त्यानंतर, त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ट्रस्टची 16,82,040 रुपये इतकी रोकड हस्तगत केली. त्याचप्रमाणे, चौकशीदरम्यान लवकुश मिश्राकडून 14,25,000 रुपये हस्तगत करण्यात आले. याव्यतिरिक्त, आरोपी रमाकांत मिश्राकडून 7,32,170 रुपये, मनीष यादव (तिन्नूचा पुतण्या) याच्याकडून 2,00,000 रुपये, करुणेश पांडे याच्याकडून 18,07,063 रुपये आणि रामशंकर यादव (उर्फ तिन्नू यादव) याच्याकडून 1,00,000 रुपये हस्तगत करण्यात आले.