वयाची चाळीशी गाठूनही ऐंशी-नव्वदीत जन्मलेली पिढी तरूण कशी? GenZ शोधत असलेलं उत्तर सापडलं

Millennials 80 आणि 90 च्या दशकात जन्मलेले 'मिलेनियल्स' आजच्या डिजिटल युगातील तरुण पिढीपेक्षा अधिक फ्रेश आणि वयाने लहान का दिसतात?

वयाची चाळीशी गाठूनही ऐंशी-नव्वदीत जन्मलेली पिढी तरूण कशी? GenZ शोधत असलेलं उत्तर सापडलं

वयाची चाळीशी गाठूनही ऐंशी-नव्वदीत जन्मलेली पिढी तरूण कशी? GenZ शोधत असलेलं उत्तर सापडलं

Why People Born In 80s And 90s Look Younger Then GenZ Research Reveals : सध्या सोशल मीडिया आणि आरोग्य विश्वात एकच चर्चा रंगली आहे की, 80 आणि 90 च्या दशकात जन्मलेले ‘मिलेनियल्स’ हे आजच्या डिजिटल युगातील तरुण पिढीपेक्षा म्हणजेच Gen-Z अधिक फ्रेश आणि वयाने लहान का दिसतात? हा केवळ जनरेशन गॅपचा विषय आहे का? तर, नाही यामागे दडलंय एक मोठे वैज्ञानिक सत्य. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनाने यावर शिक्कामोर्तबही केलं आहे. चला तर मग, मिलेनियल्सच्या चीर-तरूण दिसण्यामागचं गुपित काय आणि संशोधनातून नेमकं काय समोर आलंय ते जाणून घेऊया…

फोटो काढताना दाखवलेली दोन बोटं ठरू शकतात तुमच्यासाठी धोक्याचे; तज्ज्ञांनी काय दिलाय इशारा

तर, फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध वैद्यकीय जर्नल ‘बीएमसी मेडिसिन’ (BMC Medicine) मध्ये एक अभ्यास प्रकाशित झालाय. यात मिलेनियल्स आणि GenZ च्या तरूण दिसण्यावर भाष्य करण्यात आले आहे. प्रकाशित अभ्यासानुसार, स्मार्टफोनचा वापर मर्यादित केल्यास मानसिक ताण, चिंता आणि अपुऱ्या झोपेची समस्या तर दूर होतेच, शिवाय अकाली वृद्धत्वाची प्रक्रिया देखील संथ होते असे नमुद करण्यात आले आहे. बालपणात स्मार्टफोनपासून दूर राहिलेल्या ‘मिलेनियल्स’ पिढीच्या चेहऱ्यावरील तेज आजही टिकून राहण्यामागे नेमकं हेच कारण असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

स्क्रीन टाईम आणि अकाली वृद्धत्वाचा संबंध काय?

तज्ज्ञांच्या मते, तरुण दिसणे किंवा निरोगी राहणे हे केवळ महागड्या स्किनकेयर प्रॉडक्ट्स किंवा फिल्टर्सवर अवलंबून नसते. यामागे शरीरातील हॉर्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. सतत स्क्रीनसमोर राहणे आणि सोशल मीडियावरील स्पर्धेतून येणारा ताण यामुळे शरीरात ‘कॉर्टिसॉल’ या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे आकाली म्हातारपण येण्याची शक्यता वाढते. अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार, आजच्या तरुण पिढीत तणाव आणि अँक्झायटीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जास्त काळ टिकणारा हा तणाव झोप खराब करतो आणि चेहऱ्यावर अकाली वृद्धत्वाच्या खुणा दाखवू लागतो.

कमालच झाली! आता मेंढ्यांच्या लोकरीने जोडली जाणार माणसांची तुटलेली हाडं; शास्त्रज्ञांचा मोठा शोध

मिलेनियल्सचा ‘बॅलन्स’ ठरतोय फायदेशीर

मिलेनियल्स पिढीचे बालपण स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशिवाय गेले. त्यांनी ऑफलाइन जग, खरी मैत्री आणि नातेसंबंध जवळून अनुभवले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनानुसार, अति-स्क्रीन टाईममुळे मानसिक थकवा आणि सामाजिक अंतर वाढते. याउलट, मिलेनियल्सच्या काळात असलेला रिकामेपण त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली. मानसशास्त्राच्या मते, कधीकधी रिकामे बसण्याने मेंदूला आराम मिळतो, ज्यामुळे क्रिएटिव्हिटी आणि भावनिक नियंत्रण वाढते. पण, आजच्या पिढीला सातत्याने स्क्रीन एंटरटेनमेंट मिळत असल्याने त्यांच्या मेंदूला विश्रांतीच मिळत नसल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

संशोधनातील दिलासादायक बातमी

या संशोधनतातून एक दिलासा देणारीदेखील बातमी समोर आली आहे. ‘बीएमसी मेडिसिन’च्या अभ्यासात तरुणांचा स्क्रीन टाईम फक्त 3 आठवडे कमी करून पाहिला गेला. परिणामी, त्यांच्यातील स्ट्रेस, अँक्झायटी आणि अपुऱ्या झोपेची समस्या झपाट्याने कमी झाल्याचे समोर आले. एकूणच काय तर, मिलेनियल्स जेन-झी पेक्षा जास्त तरुण दिसतात की नाही, यावर पूर्ण वैज्ञानिक शिक्कामोर्तब झाले नसले तरी, मानसिक शांतता, संतुलित जीवनशैली आणि डिजिटल डिटॉक्स यामुळे एजिंगची प्रक्रिया नक्कीच संथ होते, हे या संशोधनाने सिद्ध केले आहे. त्यामुळे जर तुम्हालाही दीर्घकाळ तरुण आणि फ्रेश राहायचे असेल, तर महागड्या क्रिम्सपेक्षा काही वेळ ‘फोन बाजूला ठेवणे’ हाच सर्वात स्वस्त आणि उत्तम उपाय आहे.

Exit mobile version