Download App

Zero Shadow Day : कुठे पाहता येणार शून्य सावली दिवस, जाणून घ्या…

Zero Shadow Day : जेव्हा सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो. तेव्हा आपली सावली सरळ पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. त्याला शून्य सावली म्हणतात. वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस निर्माण होतो. सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो.

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण कर्क वृत्ताच्या दक्षिण आणि उत्तर या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो.

लोकसंख्या वाढीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 2 किंवा 3 मुलांना जन्म दिल्यावर मिळणार वेतनवाढ

राज्यात कधी आणि कुठे दिसणार शून्य सावली

13 मे – लातूर
14 मे – अलिबाग, दौंड, पुणे
15 मे – मुंबई
16 मे – नगर, कल्याण, नांदेड, ठाणे
18 मे – पैठण
19 मे – जालना
20 मे – औरंगाबाद, नाशिक
21 मे – मनमाड
22 मे – यवतमाळ
23 मे – बुलडाणा, मालेगाव
24 मे – अकोला
25 मे – अमरावती
26 मे – भुसावळ, जळगाव, नागपूर

Tags

follow us