Download App

विठ्ठल साखर कारखान्यावर जप्ती, अभिजित पाटलांचे शेतकऱ्यांना वचन; ‘स्वत:ला गहाण ठेवू, पण…’

स्वत:ला गहाण ठेवेल, पण कारखान्याला काही होऊ देणार नाही, असं विठ्ठल साखर कारखान्यावरील जप्तीनंतर अभिजित पाटलांचं शेतकऱ्यांना वचन.

  • Written By: Last Updated:

Abhijit Patil Promise Farmers : शरद पवारांचे विश्वासू अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर (Vitthal Cooperative Sugar Factory) आज जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली असतानाच, अभिजित पाटी यांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिखर बँकेकडू (Shikhar Bank) ही जप्तीची कारवाई करण्यात आली. दरम्यान, यावर आता अभिजित पाटील यानी भाष्य केलं.

स्वत:ला गहाण ठेवेल, पण कारखान्याला काही होऊ देणार नाही, असं पाटील म्हणाले.

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना न्यायालयाचा धक्का! लैंगिक छळ प्रकरणात नव्याने चौकशीची मागणी फेटाळली 

प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीने आज पंढरपुरमध्ये सभा घेतली. या सभेला शऱद पवारांसह महाविकास आघाडीचे अनेक नेते सहभागी होते. या सभेला संबोधित करतांना पाटील म्हणाले, राज्य सहकारी बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची तीन गोदामे जप्त केली. मागच्या ३-४ महिन्यांपासून साखर कारखान्यावर कारवाई सुरू होती. याविरोधात आम्ही बीआरटी न्यायालयात गेलो. परंतु, गुरुवारी रात्री न्यायालयाने कारवाईवरील स्थगिती उठवल्याने आज बँकांने गोदामे सील केली आहेत. निवडणुका सुरू असतांना कारवाई करून कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही पाटील यांनी केला.

46 एकर जमीन, इनोव्हा कार, स्वराजचा ट्रॅक्टर… जेपी गावित यांची संपत्ती आहे तरी किती? 

निवडणुका सुरू असताना ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कारवाईमुळं कोणताही काळजी करू नये. शेतकऱ्यांची सर्व उसाची बिले दिले जातील. मी कारखान्याच्या सर्व सभासदांना वचन देतो की, वेळ पडली तर स्वत:ला गहाण ठेवेल, कोणतीही किंमत मोजावी लागली, काहीही निर्णय घ्याला लागला तरी तो घेऊ, पण शेतकऱ्यांचा हा विठ्ठल साखर कारखाना वाचवू, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, शिखर बँकेचे साखर कारखान्यावर 450 ते 500 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज माजी संचालकांनी घेतले होते. हे कर्ज फेडले नसल्यानं बँकेने कारवाई सुरू केली. अभिजित पाटील यांनी या कारवाईला स्थगिती मिळवली होती. मात्र ही स्थगिती संपताच आज बॅंकेने कारवाई केली. त्यामुळं आता पाटील काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us