पुणे : सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान उपस्थितांना कचाकचा बटण दाबा असं विधान करणं अजित पवारांना (Ajit Pawar) भोवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता असून, अजित पवारांच्या या विधानाची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. (EC Ordered Inquiry Of Ajit Pawar Controversial Statement)
लोकसभेच्या रणधुमाळीतचं संजय काकडे संन्यास घेणार?; म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती…
अजितदादांचं विधान अन् निवडणूक आयोगात तक्रार
इंदापूर येथे डॉक्टर आणि वकिलांना संबोधित करताना अजितदादा म्हणाले होते की, तुम्हाला हवा तेवढा निधी देण्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण जसा निधी हवा. तसेच आमच्यासाठी कचाकचा बटणंही दाबा. म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असे वादग्रस्त वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानाविरोधात निवडणूक आयोगाकड तक्रार दाखल करण्यात आली होती. आता याच तक्रारीची दखल घेत आयोगाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
‘बटण कसं दाबायचं मी सांगणार नाही’, खोचक प्रत्युत्तर देत पवारांची अजितदादांवर ‘कडी’
विरोधक बरसताच दादांचं स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawawr) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन विरोधक अजितदादांवर टीकेची झोड उठवण्यास सुरूवात झाली. त्यानंतर याबाबत अजितदादांनी स्पष्टीकरण दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘खटाखट खटाखट’ गरिबी हटाव असे विधान केले होते. त्यामुळे मी ग्रामीण भागात प्रचलित असलेला ‘कचाकचा’ हा शब्द प्रयोग केला. त्यात ‘एका शब्दाचा उगाच बाऊ करु नये असे म्हटले.
मुलींबाबतही वादग्रस्त विधान
निधीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून धुराळा उडालेला असताना दुसऱ्या एका सभेत बोलताना अजित पवारांनी मुलींबाबतही वादग्रस्त विधान केले. मुलींच्या जन्मदराबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे भविष्यात मुलींची संख्या जर कमी असेल तर द्रौपदी सारखं करावं लागेल. मात्र त्यानंतर लगेच त्यांनी यातला गंमतीचा भाग सोडून द्या, नाहीतर म्हणतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. मला कुणाचाही अपमान करायचा नाही. असं स्पष्ट करत हात जोडले. मात्र जितेंद्र आव्हाडांनी या वक्तव्यावरुन अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
जे विष होतं ते बाहेर आलं – आव्हाड
अजित पवार यांच्या डोक्यात जे विष होतं ते बाहेर आलं आहे. त्यांच्या काकांनी महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न केला. ज्या महाराष्ट्रात महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे, शिवाजी महाराजांनी कर्मकांडाला विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना न्याय दिला त्यांच्याच महाराष्ट्रात एक माणूस स्त्रिया द्रौपदी झाल्या असत्या असं म्हणतात. द्रौपदीचा अर्थ काय होतो? त्यांनी जरा समजवून सांगावं आणि समस्त महिला वर्गाची माफी मागावी असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.