Download App

पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याबद्दल अजित पवारांच मोठ विधान! म्हणाले, फक्त ही निवडणूक…

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : कोणत्याही राजकीय घरण्यात फूट पडली तरी पवार कुटुंबात तशी काही फूट पडणार नाही कायम चर्चा  असायची. मात्र, या चर्चेला छेद दिला तो अजित पवार यांनी. आता या फुटीला कुणी कितीही राजकी भूमिका म्हणलं तरी वारंवार अजित पवार ज्या पद्धतीची टीका सभांमधून करत आहेत त्यावरून पवार कुटुंबातील ही राजकीय फुटीसह कौटुंबिक फुटही आहे असं म्हणता येईल. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर अजित पवार आणि (Sharad Pawar) शरद पवार पुन्हा एकत्र येणार का? हा विषय लोकांमध्ये चर्चिला जात असतो. मात्र, हा प्रश्न आता थेट अजित पवार यांना विचारला गेला आहे. त्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) संमिश्र असं उत्तर दिल्याने पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

 

ही 7 तारखेची निवडणूक एकदा होईद्या

राज्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी निवडणूक म्हणजे बारामती लोकसभा निवडणूक आहे. येथे गेली अनेक वर्ष कौटुंबीक नात्याला जपत राजकारण करणाऱ्या नणंद-भावजयी एकमेकींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकीनंतर शरद पवार आणि तुमच्यातील नातं पुन्हा पहिल्यासारखं होणार का? असा प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले, ही 7 तारखेची निवडणूक एकदा होईद्या. तोपर्यंत मला यावर काही बोलायचं नाही. कारण बारामतीत याबाबत शंका निर्माण करणारा प्रचार सुरू आहे. आम्ही पुढे एकत्र येणार असा हा प्रचार सुरू आहे. परंतु, हा प्रचार लोकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. माझे मतदार, सहकारी आणि कार्यकर्त्यांनी माझ्या भूमिकेला साथ द्यावी. मोठ्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि मतदारांनी भरभक्कम पाठिंबा द्यावा अशी विनंती करत अजित पवारांनी या विषयावर जास्त स्पष्ट बोलणं यावेळी टाळलं.

 

बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का?

या निवडणुकीत भावनिक होऊन विचार करायचा नाही असं मी ठरवलं आहे. कारण निवडणुकीत भावनिक होऊन चालत नाही. येत्या 7 मे पर्यंत म्हणजे बारामतीची निवडणूक होईपर्यंत मऊ व्हायचं नाही असं मी ठरवलं आहे. सध्या डोक्यात बारामतीचा अधिक विकास पाहिजे असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार असं मिळून काम करता आलं पाहिजे. हे काम अधिक गतीने होणं गरजेचं आहे. त्यामुळे बारामतीची जागा लढत असताना समोरचे उमेदवार त्यांच्या परिने ते प्रयत्न करत आहेत. ही काही भावकी किंवा गावकी अशी लढाई नाही. ही देशाची लढाई आहे. तुम्हाला बहिणीच्या विरोधात प्रचार करताना तुम्हाला वेदना होतात का? या प्रश्नावर अजित पवार यांनी वरील उत्तर दिलं आहे.

follow us