Download App

कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडेंवर कारवाई, सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन

  • Written By: Last Updated:

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघा (Kolhapur Lok Sabha Constituency) बंडखोरी करणारे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (Bajirao Khade) यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल (Nana Patole) यांच्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली आहे.

मोदींना कधीपासून मंगळसुत्राचं महत्व कळायला लागलं? उद्धव ठाकरेंचा उपरोधिक सवाल 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ जागावाटपात कॉंग्रेसकडे आला. मात्र, कॉंग्रेसकडून कोल्हापूरात लोकसभा लढवण्यासाठी कोणीच इच्छुक नसल्यानं पक्ष नेतृत्व आपला विचार करेल, या अपेक्षेने खाडे यांनी जोमाने कामाला सुरूवात केली होती. मात्र, काँग्रेसने शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी जाहीर केल्यानं खाडे नाराज झाले होते. दरम्यानच्या काळात कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारींसह काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढली होती. मात्र, खाडे यांची समजूत काढण्यात कॉंग्रेस अपयशी ठरली. त्यानंतर खाडेंनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षाकडून बेदखल केलं जात असून स्वाभिमानासाठी मैदानात उतरल्याची घोषणा केली होती.

मिस वर्ल्ड Manushi Chhillar चा बोल्ड अन् ब्युटीफुल अंदाज, पाहा फोटो… 

खाडेंनी केलेल्या बंडामुळं कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळं पक्ष खाडे यांच्यावर कारवाई करणार का? अशी चर्चा होती. दरम्यान, आता काँग्रेसकडून खाडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने खाडे यांना सहा वर्षासाठी निलंबित केलं.

दरम्यान, कोल्हापूर लोकसभेसाठी मविआकडून शाहू महाराज आणि तर महायुतीकडून शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक रिंगणात आहेत. शाहू महाराजांना ओबीसी, वंचित तसेच एमआयएमचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळं मंडलिकांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.

कोण आहेत बाजीराव खाडे?

करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील बाजीराव खाडे गेल्या २८ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. युवक काँग्रेसपासून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पक्षनेतृत्वाने त्यांना विविध राज्यांची जबाबदारीही दिली होती.

follow us