Download App

मैत्री, नातं-गोतं, भावकी बाजूला ठेवा. महायुतीचा धर्म पाळा : अजितदादांचा कार्यकर्त्यांना ‘डोस’

मावळ : लोकसभेची निवडणूक होईपर्यंत “मैत्री, नातं-गोतं, भावकी बाजूला ठेवा आणि महायुतीचा धर्म पाळा”, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या आहेत. ते मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (Shivsena) उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. (A clear instruction to the workers of Deputy Chief Minister and NCP chief Ajit Pawar on the occasion of lok sabha Election)

घरवापसीपूर्वीच एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? चंद्रकांत पाटलांची हायकोर्टात धाव

यावेळी पवार म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात आपल्याला फक्त महायुतीचाच उमेदवार निवडून आणायचा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आपण अनेकांना ओळखतो. आपल्या विरोधातील उमेदवाराचे आणि आपले अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. पण, माझी सर्वांना, त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, 13 तारखेचे मतदान होईपर्यंत कोणालाही भेटायला जाऊ नका.

सांगलीत चंद्रहार पाटीलच मविआचे ‘पैलवान’ : विश्वजित कदम, विशाल पाटलांचे डाव ठाकरेंपुढे फेल

दादा सहज गेलो होतो, गप्पा मारायला गेलो होतो. आता गप्पा नको आणि टप्पा नको. मैत्री, नातं-गोतं, भावकी बाजूला ठेवा आणि महायुतीचा धर्म पाळा. समोरचा उमेदवार सांगेल दादांनीच मला पाठवले आहे. दादांनीच मला उभा राहा म्हणून सांगितले आहे. पण हे धांदात खोटे आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, मी स्पष्ट आणि खरा बोलणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आपल्याला मावळमध्ये धनुष्यबाण ऐके धनुष्यबाण हेच चिन्ह चालवायचे आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात मुख्य लढत :

श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. महायुतीमध्ये आपल्याचा तिकीट मिळेल, असा त्यांचा दावा आहे. पाच वर्षांच्या कामाच्या जोरावर मतदार पुन्हा आपल्यालाच संधी देतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, अजित पवार यांची साथ यामुळे विजय आपलाच होणार असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत.

दुसऱ्या बाजूला संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवंगत महापौर भिकनशेठ वाघेरे-पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे. वाघेरे हे पिंपरीगावातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते महापौरही राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुक लढल्या गेल्या आहेत. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे याही माजी नगरसेविका आहेत.

follow us

वेब स्टोरीज