सांगलीत चंद्रहार पाटीलच मविआचे ‘पैलवान’ : विश्वजित कदम, विशाल पाटलांचे डाव ठाकरेंपुढे फेल

सांगलीत चंद्रहार पाटीलच मविआचे ‘पैलवान’ : विश्वजित कदम, विशाल पाटलांचे डाव ठाकरेंपुढे फेल

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी मागे घ्यावी किंवा मैत्रीपूर्ण लढतीला मान्यता द्यावी, यासाठी सुरू असलेले काँग्रेसचे (Congress) सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तडजोडीसाठीची भेटच नाकारुन त्यांच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. त्यामुळे पाटील यांच्या नावाची महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषणा होणार आहे. याबाबत आज (9 एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार असलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा होणार आहे. (Chandrahar Patil of Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party is going to be the candidate of Mahavikas Aghadi in Sangli Lok Sabha Constituency.)

महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील काही जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद झाले होते. यात सांगलीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये प्रचंड ताणाताणी झाली. ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केली. त्यामुळे आमदार विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी थेट दिल्ली गाठून सांगलीची उद्धव ठाकरे यांची मे रोजी सभा जागा सोडू नये, अशी मागणी केंद्रीय नेत्यांकडे केली होती. विश्वजित कदम यांनी मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची आणि नागपूरमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांचीही भेट घेतली होती.

रक्षा खडसेंविरोधात शरद पवारांनी उमेदवार शोधला ! श्रीराम पाटलांवर उद्या होणार शिक्कामोर्तब?

मात्र हा चेंडू सोनिया गांधी यांच्या कोर्टात असल्याचे सांगण्यात येत होते. ठाकरेंकडून सुरुवातीपासूनच याबाबत प्रदेश नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा केली जात होती. अशात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. पण सांगलीच्या विषयावर प्रदेश नेत्यांशी कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही राष्ट्रीय नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे, असा निरोप ठाकरेंनी दिला. ठाकरेंनी भेट नाकारली याचा स्पष्ट अर्थ त्यांनी कोणत्याही तडजोडीला तयारी नसल्याचे संकेत दिले. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.

कॉंग्रेस कडू कारले तर ठाकरेंची नकली सेना; पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेससह ठाकरे गटावर निशाणा

या स्थितीत होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेस नेते हजर राहणार आहेत. या बैठकीत राज्यातील ४८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. त्यात सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याशिवाय दोन मे रोजी सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांची प्रचार सभाही होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ‘मशाल’ हे चिन्ह लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज