Download App

Congress Candidate List : जालन्यातून डॉ. कल्याण काळे, तर धुळ्यातून शोभा बच्छाव रिंगणात

  • Written By: Last Updated:

Congress Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) काँग्रेस (Congress) पक्षाने आज चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील दोन जागांचा समावेश आहे. यात कॉंग्रेसने जालन्यातून डॉ. कल्याण काळे (Dr. Kalyan Kale) यांना उमेदवारी दिली. तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी दिली.

Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z 

जालना लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. दरम्यान, आता जालन्यातून कॉंग्रेसने रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या अधिकृत X अकाऊंवटर याबाबत माहिती दिली. काँग्रेसचे कल्याण काळे हे आता भाजपच्या रावसाहेब दानवेंशी निवडणुकीच्या रिंगणात दोन हात करणार आहेत. डॉ. कल्याण काळे हे संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

‘गरिब समाजातून आलो’, मोदींच्या विधानावर पटोलेंचा सवाल, एससी, एसटींची आत्ताच आठवण का? 

जालना हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या जागेवरून रावसाहेब दानवे पाच वेळा विजयी झाले आहेत. आता ते सहाव्यांदा लोकसभेसाठी निवडणूक लढवत आहेत. 2009 मध्ये डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी काळे यांचा अवघ्या सात हजार मतांनी पराभव झाला होता.

धुळ्यातून शोभा बच्छाव या भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्याशी लढत देणार आहेत. त्यांनी राज्यमंत्री म्हणून यापूर्वी काम पाहिलं आहे. त्या आता भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना लढत देतील.

follow us