Download App

कोल्हापूरच्या बंडखोराविरोधात काँग्रेसचं कठोर पाऊल : ठाकरेंच्या मागणीनंतरही विशाल पाटलांना मात्र अभय?

कोल्हापूर : काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या बाजीराव खाडे (Bajirao Patil) यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. खाडे काँग्रेसचे (Congress) माजी सचिव आहेत. ते काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र काँग्रेसने ऐनवेळी शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी दिल्याने खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

कोण आहेत खाडे?

बाजीराव खाडे हे मागील 28 वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. युवक काँग्रेसपासून आपल्या राजकारणाची सुरुवात करत त्यांनी सचिव पदापर्यंत मजल मारली होती. अनेक राज्यांमध्ये त्यांनी सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पडली आहे. ते प्रियंका गांधी यांच्या टीममधील समजले जातात. मागील काही दिवसांपासून ते काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी तयारी करत होते. मात्र काँग्रेसने ऐनवेळी शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रदेश पातळीवरीने नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना डावललं जातं, असं म्हणत खाडे यांनी बंडखोरी कायम ठेवली.

CM शिंदेंसाठी मुंबई अवघडच! शिंदेंच्या मनातील ‘त्या’ दोन नावांना ‘मनसे’चा तीव्र विरोध

विशाल पाटलांबाबत अद्याप निर्णय नाहीच :

दरम्यान, कोल्हापूरप्रमाणे सांगलीमध्येही काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविरोधात त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. सुरुवातील पाटील इथून काँग्रेसकडून तयारी करत होते. मात्र जागा वाटपात सांगलीची जागा ठाकरेंच्या सेनेला गेली. त्यामुळे काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र तो निर्णय न होऊ शकल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यानंतर विशाल पाटील यांचीही प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पाटील उमेदवारीवर कायम राहिले. त्यामुळे आता पाटील यांचेही निलंबन होणार का? की काँग्रेसकडून त्यांना अभय दिले जाणार हे बघणे महत्वाचे राहणार आहे.

ठरलं..! उत्कर्षा रुपवते आज भरणार उमेदवारी अर्ज; वंचित आघाडीची शिर्डीत एन्ट्री

विशाल पाटलांवर काँग्रेस कारवाई करेल…

उद्धव ठाकरे यांची आज नांदेड येथे पत्रकार परिषद पाडली. यावेळी पत्रकारांनी त्यांना विशाल पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल, असे म्हणत ठाकरेंनी हा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टोलवला. यापेक्षा उद्धव ठाकरे या मुद्द्यावर जास्त काही बोलले नाहीत.

follow us