मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाची कोंडी झाली होती. मात्र, आता या नसीम खान यांनी यू-टर्न घेत प्रचार समितीच दिलेला राजीनामा मागे घेतल असल्याची घोषणा केली आहे. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नसीम खान नाराज होते. त्यानंतर त्यांनी स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिला होता. मात्र, आता त्यांना राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर करत नसीम खान पदासाठी नव्हे तर, काँग्रेसच्या विचारधारेसाठी काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे. मी गांधी नेहरू परिवाराच्या नेतृत्त्वाखाली काम करत असल्याचेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीच काम सुरु पण आमचे काही प्रश्न; वर्षा गायकवाड दिल्लीत जाण्यावर ठाम
नाराजी दूर वर्षा गायकवाडांचा प्रचार करणार
यावेळी बोलताना नसीम खान म्हणाले की, माझ्या मनात कोणतीही नाराजी नसून, काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यासाठी मैदानात उतरून त्यांच्या विजयासाठी जोरदार प्रचार करणार आहे. यावेळी त्यांनी निरूपम यांच्या पक्ष बदलाबात अधिखचे भाष्य करायचे नसल्याचे सांगितले. काँग्रेसचे नाराज ज्येष्ठ नेते वर्षा गायकवाड यांना मदत करायची नाही असे म्हणत आहे. त्यावर खान म्हणाले की, ही चुकीची माहिती असून, विरोधी पक्षाकडून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मविआतील सर्व वरिष्ठ नेत्यांनी मला नाराजी दूर करण्यासाठी बोलावले होते.
‘नाशकात भूसंपादनाच्या नावाखाली कोट्यावधींचा घोटाळा, दोन दिवसांत खुलासा करू’ : संजय राऊत
नसीम खान यांच्या नावाची चर्चा पण..
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असल्याने गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेसने सर्वांना धक्का देत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. राजकीय वर्तुळात काँग्रेसकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात नसीम खान यांच्यासोबतच भाई जगताप आणि अन्य काही नावांची चर्चा होती. पण पक्षाने धक्कातंत्र देत ऐनवेळी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाकडून मला तयारी करायला सांगण्यात आले होते. मात्र अचानक काय झाले की, पक्षाने मला उमेदवारी नाकारली असे म्हणत नसीम खान यांनी नाराजी व्यक्त केली होती.