तुमच्यासाठी दिलेला उमेदवार मागे घेऊ, फक्त हिमंत दाखवा : काँग्रेसच्या नाराज नेत्याला एमआयएमची ऑफर

तुमच्यासाठी दिलेला उमेदवार मागे घेऊ, फक्त हिमंत दाखवा : काँग्रेसच्या नाराज नेत्याला एमआयएमची ऑफर

Imtiaz Jalil offer to Arif Naseem Khan : लोकसभेच्या रणसंग्रामात या पक्षातून त्या पक्षात जाणं हे सुरूच असतं. तसंच, पक्षात आपल्याला उमेदवारी मिळत नसल्याने मोठी नाराजी अनेक नेत्यांमध्ये असते. आता एआयएमआयएम या पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेस नेते माजी मंत्री आरिफ नसीम खान यांना ऑफर दिली आहे.  उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रमध्ये आरिफ नसीम खान नाराज आहेत.

 

राहुल गांधी, शरद पवारांना मुस्लिम मते हवी, पण…; इम्तियाज जलील यांची घणाघाती टीका

स्टार प्रचारकपदाचा राजीनामा

काँग्रेसला सोडा, एकदा हिंमत दाखवा मुंबईत तुम्ही सांगाल त्या लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला उमेदवारी देऊ अशा शब्दांत छत्रपती संभाजीनगरचे लोकसभा उमेदवार इम्तियाज जलील यांनी आरिफ नसीम खान यांना ऑफर दिली आहे. दरम्यान, खान यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचार समिती आणि पक्षाच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. तसंच, गेली अनेक दिवसांपासून आपण पक्षाचं काम करत आहोत असंही ते म्हणाले  आहेत.

 

एक तरी जागा मुस्लीम समाजाला सोडायला हवी होती

मी वारंवार महाविकास आघाडीबद्दल बोललो आहे. यांना मुस्लिमांची मत हवी आहेत. मात्र, मुस्लीम नेतृत्व नकोय. आज महाराष्ट्रातील उमेदवार पातळीवर परिस्थिती पाहिली तर, महाराष्ट्रात यांनी एकही जागा मुस्लिम उमेदवाराला दिली नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने मुंबईत नाही तर किमान महाराष्ट्र एक तरी जागा मुस्लीम समाजाला सोडायला हवी होती अशी अपेक्षाही जलील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

 

Lok Sabha Election: महायुतीच्या मिशन 45 ला झटका, महाविकास आघाडी अन् महायुतीला किती जागा?

उमेदवार दिला असेल तर तो मागे घेऊ

नसीम खान यांना ऑफर देताना इम्तियाज जलील म्हणाले, नसीम खान यांनी राजीनामा नाही पक्षालाच लाथ मारायला पाहिजे होती. तसंच, खान यांना लक्षात यायला हवं की काँग्रेसला मुस्लीम समाजाचं नेतृत्व नाही तर मतं हवी आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्ही मुंबईतील कोणतीही जागा सांगा. तुमची मागणी असेल तो मतदारसंघा देऊ. तिथे उमेदवार दिला असेल तर तो मागे घेऊ. तुम्ही फक्त हिंमत दाखवा अशा शब्दांत जलील यांनी खान यांना जोरदार ऑफर दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube