राहुल गांधी, शरद पवारांना मुस्लिम मते हवी, पण…; इम्तियाज जलील यांची घणाघाती टीका

  • Written By: Published:
राहुल गांधी, शरद पवारांना मुस्लिम मते हवी, पण…; इम्तियाज जलील यांची घणाघाती टीका

MP Imtiaz Jalil on Rahul Gandhi : केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला (Women’s Reservation Bill) काल लोकसभेत (Lok Sabha) मंजुरी मिळाली. सध्या या आरक्षणावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. काल एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. महिला आरक्षण विधेयकात मुस्लिम महिलांसाठी कोणतीही तरतूद नसल्यानं त्यांनी विरोधात मतदान केलं. दरम्यान, आता खासदार इम्तियाज जलील या विधेयकावरून भाजपसह, राहुल गांधी, ( Rahul Gandhi) शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीका केली.

https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0

लोकसभेत महिला विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर आता यावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. काल या अधिवेयकाला मंजूरी मिळाल्यावर अनेकांनी हा चुनावी जमुला असल्याची टीका केली. आता इम्तियाज जलील यांनीही महिला आरक्षणाचा निर्णय पाच राज्यांतील निवडणुका लक्षात घेण्यात आल्याचं सांगितलं.

पुढे बोलतांना म्हणाले, शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मते हवी आहेत. पण त्यांच्या बाजूला बसलेला इम्तियाज जलील त्यांना नको आहे. भाजपला पराभूत करायचं असेल तर आम्हाला कमकुवत समजू नका. आमची देखील ताकद आहे. इंडिया आघाडीत जे पक्ष घेतले, त्यांची ताकद नाही. पण, आम्हाला मानणार मोठा वर्ग आहे, असं जलील यांनी म्हटलं आहे.

Tamanna Bhatia कडून महिला आरक्षणाचं कौतुक; संसदेला देखील दिली भेट 

जलील पुढे म्हणाले की, एमआयएम पुढील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. कोणी सोबत आले तर आपण त्याला सोबत घेऊ. अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. जेव्हा सरकारकडे काही नसते, तेव्हा शहरांची नावे बदलली जातात. शहरांची नावे बदलून तुम्ही काय साध्य करणार आहात? आमच्याकडे छत्रपती संभाजीनगरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री विमानाने आले आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घोषणा करून गेले, अशी टीका त्यांनी राज्य सरकावर केली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube