Lok Sabha Election: महायुतीच्या मिशन 45 ला झटका, महाविकास आघाडी अन् महायुतीला किती जागा?

Lok Sabha Election: महायुतीच्या मिशन 45 ला झटका, महाविकास आघाडी अन् महायुतीला किती जागा?

Lok Sabha 2024 ABP-C Voter Opinion Poll : सध्या लोकसभेच्या रणसंग्रमात आता वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वांचेच निवडणूक अंदाज येत आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी मराठवाड्यात 8 जागा आहेत. यामध्ये महायुती 3 तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 5 जागा मिळतील असां सध्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालं असलं तरी (Lok Sabha 2024) महायुतीकडून आणखीही छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार देण्यात आला नाही. असं असलं तरी ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला (UBT) जात असल्याचं अंदाज सांगत आहेत. मात्र, येथे विद्यमान खासदार इम्तियाज जलिल हे एआयएमआयएमकडून उमेदवार आहेत. तर, महायुतीचा उमेदवार आजून ठरणार आहे. असं असलं तरी येथे तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे.

 

काही ठिकाणी उमेदवारही जाहीर झालेले नाहीत

2019 ला जी स्थिती होती ती स्थिती यावेळी नाही. 2022 मध्ये शिवसेनेची दोन शकल झाली तर 2023 मध्ये राष्ट्रवादीचे दोन शकलं झाली आहेत. यामध्ये शिवसेना दोन आहेत आणि राष्ट्रवादीही दोन आहेत. त्यामुळे लोकसभेच्या यंदाच्या रणसंग्रामात उमेदवार ठरवण्यापासूनचं मोठा संघर्ष सर्वच पक्षांत पाहायला मिळाला आहे. अनेक ठिकाणी नाराजांची मोठी संख्या असताना कुणाची समजूत काढावी आणि कुणाला उमेदवारी द्यावी असा पेचप्रसंग सर्वच पक्षनेतृत्वामोर असल्याचे पाहायला मिळत आहे. चार दिवसांवर काही ठिकणी निवडणूक आलेली असताना काही ठिकाणी उमेदवारही जाहीर झालेले नाहीत अशी स्थिती सध्या आहे.

 

मागच्यावेळीपेक्षा कमी जागा

एबीपी माझाच्या सी ओटर्सच्या सर्वेमध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.गेल्यावेळी शिवसेना आणि भाजप यांची युती असाताना तब्बल 42 जागा जिंकल्या होत्या. त्या महायुतीला यावेळीही चांगल्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु, अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट एकत्र आलेले असतानाही महायुतीला मागच्यावेळी ज्या जागा मिळाल्या होत्या त्या यावेळी मिळतील अशी स्थिती नाही असंही यामधून समोल आलं आहे. तर, काँग्रेस, ठाकरे गट आणि पवार गटाला मागच्यावेळी पेक्षा चांगल यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीला 30 जागांवर विजय मिळेल असं सांगितल गेलय. यामध्ये भाजपला 21 ते 22, शिंदे गटाला 9 ते 10 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकाही जागेवर विजय मिळणार नाही असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचाही पराभव होण्याचा अंदाज वर्तवण्याता आला आहे.

 

महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 48 पैकी 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळण्याचा अंदाज एबीपी माझाने आपल्या ओपिनियन पोलनुसार वर्तवला आहे.यामध्ये काँग्रेसला 3, शरद पवार गटाला 5 आणि उद्धव ठाकरे गटाला एकूण 9 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला गडचिरोली-चिमूर, नंदुरबार आणि नांदेडमध्ये विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, शरद पवार गटाला बारामती, सातारा आणि शिरुर या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये विजय मिळेल, असा अंदाज आहे.

 

कोणत्या पक्षाला किती जागा?

महायुती – 30

महाविकास आघाडी – 18
———–
भाजप – 21/22
शिवसेना (एकनाथ शिंदे) – 9/10
राष्ट्रवादी (अजित पवार ) – 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) – 9
राष्ट्रवादी (शरद पवार) – 5
काँग्रेस – 3
———–
एकूण – 48

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज