Lok Sabha 2024 : ठरलं तर! कंगनाविरोधात काँग्रेसचा हुकूमी एक्का; माजी CM चा मुलगा मैदानात

Lok Sabha 2024 : ठरलं तर! कंगनाविरोधात काँग्रेसचा हुकूमी एक्का; माजी CM चा मुलगा मैदानात

Congress Release Another List of 16 Candidates : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी एक (Lok Sabha Elections) यादी शनिवारी जाहीर केली. या पंजाबमधील एक, गुजरातमधील चार, हिमाचल प्रदेश 2 आणि ओडिशा राज्यातील 9 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हीला तिकीट दिले आहे. कंगनाच्या विरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार असा प्रश्न विचारला जात होता. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत मंडी मतदारसंघात विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विक्रमादित्य सिंह हिमाचल काँग्रेस प्रभारी प्रतिभा सिंह आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत.

Congress Manifesto : महिलांना वार्षिक 1 लाख, 30 लाख नोकऱ्या; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?

या यादीबरोबरच गुजरात राज्यात पाच जागांवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठीही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी  जाहीर केलेल्या या यादीत एकूण 16 उमेदवारांना तिकीट देण्यात आले. यात सर्वाधिक चर्चा हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघाची होत आहे. या मतदारसंघात कंगना राणावात रिंगणात आहे. या निवडणुकीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

कंगनाने आपल्या आक्रमक स्टाइलमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकांचाही चांगला प्रतिसाद तिला मिळत आहे.  भारतीय जनता पार्टीच्या बाजूने तिची वक्तव्ये आधीपासूनच चर्चेत आहे. मुंबईत महाविकास आघाडी सरकाबरोबर झालेला वाद, सुशातसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण यांसह अन्य मुद्द्यांवर कंगनाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला चांगलेच घेरले होते. त्यानंतर कंगना लवकरच राजकारणात एन्ट्री घेईल अशी चर्चा होती.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 6 बंडखोर, 3 अपक्ष आमदारांचा भाजपात प्रवेश

यानंतर भाजपने तिला थेट मंडीतून तिकीट दिले. कंगनाच्या विरोधात काँग्रेस कुणाला संधी देणार याची चर्चा होती. कंगनाच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देणे गरजेचे होते. याचा विचार करून काँग्रेसने अखेर विक्रमादित्य सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आता या मतदारसंघात अटीतटीची लढत होणार हे मात्र नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube