हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 6 बंडखोर, 3 अपक्ष आमदारांचा भाजपात प्रवेश
Himachal Pradesh Politics : ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे सर्व 6 बंडखोर आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसचे आमदार सुधीर शर्मा (MLA Sudhir Sharma), रवी ठाकूर, राजेंद्र राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो आणि इंदर दत्त लखनपाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय तीन अपक्ष आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थित या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1 जून रोजी या सर्व 6 विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत.
अमरावतीत भाजपाचाच उमेदवार; राणा-अडसूळ वादाला बावनकुळेंची हवा
हिमाचल प्रदेशातील सतत वाढत असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक माजी आमदार भारतीय जनता पक्षात (भाजप) मध्ये जाण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत आता काँग्रेसचे सहा माजी आमदार आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते भाजपच्या तिकिटावर येथून पोटनिवडणूक लढवू शकतात, असेही बोलले जात आहे.
लहरी स्वभाव माहीत असूनही अण्णांना पाठिंबा दिला; केजरीवालांच्या अटकेनंतर आपचा नेता भडकला
व्हीपचे पालन न केल्याबद्दल 29 फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र राणा, इंदर दत्त लखनपाल, चैतन्य शर्मा आणि देवेंद्र कुमार भुट्टो यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. हिमाचल प्रदेशचे सभापती कुलदीप सिंह यांनी राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या या सर्व 6 आमदारांना अपात्र ठरवले होते. या सर्व आमदारांवर पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.
#WATCH | Six rebel MLAs of Himachal Pradesh- Sudhir Sharma, Ravi Thakur, Inder Dutt Lakhanpal, Devendra Bhutto, Rajendra Rana, and Chaitanya Sharma, join BJP in the presence of Himachal Pradesh BJP President Rajiv Bindal and Union Minister Anurag Thakur. pic.twitter.com/IftAl6U1T5
— ANI (@ANI) March 23, 2024
तीन अपक्ष आमदार आशिष शर्मा, होशियार सिंह आणि केएल ठाकूर यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्यांच्या मतदारसंघातही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हिमाचलचे बंडखोर आमदार सुधीर शर्मा म्हणाले की, जेव्हा आपण जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू शकत नाही, तेव्हा आमदार होण्यात काय अर्थ आहे? त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीत आम्ही आमच्या राज्यातील हर्ष महाजन यांना मतदान केले. आज आपण सर्वजण आपल्या इच्छेने भाजपमध्ये आल्याचं ते म्हणाले.
कॉंग्रेसकडे बहुमतापेक्षा कमी आमदार
दरम्यान, काँग्रेस सरकारवरील संकटाचे ढगही गडद झाले आहेत. हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या 68 जागा असून बहुमतासाठी 35 जागा आवश्यक आहेत. काँग्रेसकडे आता ३४ आमदार आहेत, त्यामुळे त्यांची संख्या बहुमतापेक्षा कमी आहे.