सावरकर पळपुटे, त्यांना कधीच महापुरूष मानणार नाही, इम्तियाज जलील यांचं वादग्रस्त वक्तव्य
Imtiaz Jalil : स्वातंत्र्यावीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर कॉंग्रेससह अनेकांनी आजवर टीका केली. आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जलील यांनी वीर सावरकरांचा उल्लेख भगौडे म्हणजे पळपुटे असा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सुदानमध्ये भीषण गोळीबार, 52 जणांचा जागीच मृत्यू, तर 64 हून अधिक गंभीर जखमी
परभणीतील संविधान गौरव सोहळ्याला इम्तियाज जलील उपस्थित होते. या सोहळ्यात बोलतांना त्यांनी त्यांनी सावरकरांवर टीका केली. ते म्हणाले, आमचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 360 भाजप खासदारांच्या उपस्थितीत लोकसभेत सांगितले की, आपल्या देशात फक्त एकच महापुरुष होऊन गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ते नाव आहे. भाजपच्या नेत्यांनी हे मान्य केलं नाही, कारण त्यांच्या मते एकच महापुरूष ते म्हणजे सावरकर. पण, ऐसे भगौडे को हम कभी माने है, ना मानेंगे, अशा शब्दात सावकरांवर जलील यांनी टीका केली.
अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांच्या बैठकीत खलबतं, तीन मोठे ठराव मंजूर, कोणते आहेत ठरावं?
जलील यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. कारण, आमदार संजय शिरसाट यांनी यावर जलील यांच्यावर टीका केली आहे. इम्तियाज जलील यांच्याकडून काय अपेक्षा करणार, ही औरंगजेबाची आणि निजामाची अवलाद आहे, त्यांना वीर सावरकरांविषयी प्रेम असण्याचं कारण नाही. अशा निजामांच्या अवलादींकडे आम्ही लक्ष देत नाही. वीर सावकरकर हे राज्याचेच नव्हे तर देशाचे दैवत आहेत, असं शिरसाट म्हणाले.
तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनीही जलील यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. इम्तियाज जलील यांचा पक्ष आणि भाजप पक्ष यांच्यात अंतर्गत संगनमत आधीपासूनच आहे. यांना बोलायला लावायचं आणि त्यानंतर भाजपने आंदोलन करून लोकांच्या भावना उद्दीपीत करायच्या हे अनेक वर्षापासून सुरू आहे आम्ही स्वतः उद्धव ठाकरेंसोबत गेल्या आठवड्यात सावरकरांच्या घरी गेलो होतो. मात्र, मोदींनी नाशिकला येऊनही सावरकरांच्या निवासस्थानी आणि स्मारकाच्या ठिकाणी जावं वाटलं नाही, अशी टीका त्यांनी केली.