सुदानमध्ये भीषण गोळीबार, 52 जणांचा जागीच मृत्यू, तर 64 हून अधिक गंभीर जखमी
Sudan Abyei Clash : जगभरात हिंसाचाराच्या घटना घडत असतांना आता सुदानमध्येही (Sudan) हिंसाचाराची एक मोठी घटना घडली आहे. सुदानमधील अंतर्गत संघर्ष संपण्याची कोणत्याही लक्षण दिसत नाही. काल (28 जानेवारी) अबेई (Abyei) येथे बंदूकधारी आणि गावकरी यांच्यात हिंसक चकमक झाली. यावेळी बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे 52 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 64 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हिंसाचारातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनं संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांच्या बैठकीत खलबतं, तीन मोठे ठराव मंजूर, कोणते आहेत ठरावं?
सुदानमध्ये झालेल्या या भीषण हिंचारातील मृतांमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकाचांही समावेश असल्याची माहिती आहे. स्थानिक एपी या वृत्तसंस्थेने एका प्रादेशिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. दरम्यान, अबेईचे माहिती मंत्री बुलिस कोच यांनी या घटनेबाबत सांगितले की, रविवारी अबेई गावकरी आणि बंदूकधारी यांच्यात चकमक झाली. यावेळी बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेक महिला आणि मुलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
Bigg Boss 17 Winner : मुनव्वर फारूकी ठरला बिग बॉसचा महाविजेता!, अभिषेक कुमार राहिना रनर अप
मंत्री कोच म्हणाले की, या हिंसाचारात सहभागी असलेले हल्लेखोर नुएर जमातीचे होते. ते मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्ज होते. गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे हे सशस्त्र तरुण त्यांच्या भागातून वरप राज्यात पळून गेले होते. तेथून परतल्यानंतर जमिनीच्या वादावरून ग्रामस्थ आणि त्यांच्यात वाद सुरू झाला होता.
सुदानमध्ये दररोज जातीय हिंसाचार होत असतो. शेजारच्या वॅरॅप राज्यातील ट्विक डिंका हे आदिवासी सीमेवरील क्षेत्रावरील अबेईच्या एनगोक डिंका यांच्याशी जमिनीच्या वादात अडकले आहेत. सुदान आणि दक्षिण सुदान दोघेही अबेईच्या मालकीचा दावा करतात. 2011 मध्ये दक्षिण सुदान सुदानपासून स्वतंत्र झाल्यानंतरही परिस्थिती निवळली नाही.
तिथं सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत असतात.
दरम्यान, या हिंसाचारानंतर एक निवदेन जारी करण्यात आलं. अबेईने शांतता सैनिकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला असून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देखील दिला.