Loksabha Election: गोविंदाची पुन्हा राजकारणात एन्ट्री! शिवसेनेत पक्षप्रवेश, उत्तर-पश्चिम मुंबईतून रिंगणात उतरणार?

Govinda in Shivsena : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Loksabha Election 2024 ) पक्षांतर आणि पक्षप्रवेश जोरदार सुरू आहेत. त्यात आता या निवडणुकीमध्ये अभिनेता गोविंदा आहूजा ( Govinda in Shivsena ) यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी गोविंदाने मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. Letsupp Special शिवतारेंनी स्वतःच आग लावली…. मग […]

Govinda In Shivsena गोविंदाची पुन्हा राजकारणात एन्ट्री! शिवसेनेत पक्षप्रवेश पण लोकसभेची अट नाही; मुख्यमंत्र्यांची माहिती

Govinda In Shivsena

Govinda in Shivsena : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Loksabha Election 2024 ) पक्षांतर आणि पक्षप्रवेश जोरदार सुरू आहेत. त्यात आता या निवडणुकीमध्ये अभिनेता गोविंदा आहूजा ( Govinda in Shivsena ) यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी गोविंदाने मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Letsupp Special शिवतारेंनी स्वतःच आग लावली…. मग ती विझली कशी? जाणून घ्या इनसाईड स्टोरी!

यावेळी बोलताना गोंविदा यांनी मराठीत आपलं भाषण केलं. ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंचे धन्यवाद. मी 2004 ते 2009 काँग्रेसमध त्यानंतर राजकारणातून बाहेर पडल्यानंतर वाटलं होतं की, पुन्हा राजकारणात येणार नाही. पण गेले 14 वर्षे राजकारणापासून दूर वनवासात राहिल्यानंतर पुन्हा माझी सुरुवात रामराज्य असलेल्या पक्षातून करत आहे. असं मला गोविंदाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच मला एकनाथ शिंदे यांनी दिलेली जवाबदारी पार पाडेल. एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईमध्ये विकास होत आहे. अशी प्रतिक्रिया गोविंदाने व्यक्त केली.

नवीन आलेल्या पक्षांना जागा पण जुन्या पक्षांना…; आता रामदास आठवलेही भाजपवर नाराज

तर मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविंदाचे नाव चर्चेत आहे. मात्र या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी सांगितलं की, गोविंदाशी लोकसभेबाबत कोणतही बोलणं झालेलं नाही. ते स्टार प्रचारक म्हणून काम करतील. मात्र मुंबईतील उत्तर पश्चिम या मतदारसंघातून त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून याच मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार असलेले गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे अमोल कीर्तीकर आणि गोविंदा यांच्यामध्ये ही लढत होण्याची शक्यता आहे.

गोविंदाने या अगोदर 2004 मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याने भाजपचे जेष्ठ नेते आणि तत्काली भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर गोविंद राजकारणापासून दूर होता. आता पुन्हा एकदा प्रक्रिया राजकारणात गोविंदाची एन्ट्री झाली आहे.

Exit mobile version