जालना : रावसाहेब दानवे सलग सहाव्यांदा खासदार होण्याचा विक्रम करणार? जरांगेंनी दानवे की काळे कुणाला दिलं बळं? या सर्वांची उत्तरं 4 जूनला मिळतीलच. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी मतांची विभागणी होणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळेच निकालात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात असून, जालन्यात दानवेंना धक्का की गुलाल पक्का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Jalana Loksabha Ground Report)
Uddhav Thackeray : ‘भाजप ‘आरएसएस’वरही बंदी आणेल’; उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर कडवट टीका
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या विरोधात रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) निवडणूक लढवत आहेत. दानवे यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काळे यांचा 8,482 मतांनी पराभव केला होता. दोन वेळा आमदार राहिलेल्या 61 वर्षीय काळे यांना त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. तीन टर्म वगळता भाजप 1977 पासून जालन्यात प्रतिनिधित्व करत आहे. वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे दानवे यांनी 1999 पासून सलग पाच वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2014 पासून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात दोनदा समावेश करण्यात आला आहे.
पाचव्या टप्प्यात २२७ कोट्याधीश अन् ३९६ ग्रॅज्यूएट; महिलांचा टक्का मात्र कमीच..
संस्था, भाजपची ताकद अन् तळागाळातील कामे
जालना मतदारसंघात दानवेंच्या अनेक संस्था आहेत. याशिवाय येथील मतदारांचा दानवे यांनी केलेल्या कामावर, तळागाळातील जनतेशी असलेला संबंध आणि मोदींच्या नावावरचा विश्वास आहे. 2014 मध्ये केंद्रात एनडीएचे सरकार आल्यानंतर त्यांनी जालन्यासाठीच नव्हे तर मराठवाड्यासाठीही अनेक कामे केली आहेत. यात प्रामुख्याने लातूरमध्ये रेल्वे कोच फॅक्टरी, रेल्वे लाईनचे विद्युतीकरण, जालन्यात ड्राय पोर्ट, रेल्वे पिटलाइन व्यतिरिक्त रस्ते विकास आदी कामांचा पाढा येथील मतदार उघडपणे मांडतात.
जरांगेंचं अप्रत्यक्ष बळ दानवेंना?
साधारण आठ महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची नोंद महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने घेतली होती. त्यानंतर जरांगेंनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना दारात उभे करू नका असे म्हणत त्यांना घरी बसवा असे आवाहन केले होते. हाच कळीचा मुद्दा केंद्रीत करत मविआकडून मराठा मतांसाठी कल्याण काळे यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नक्कीच पार पडलेल्या मतदानात याचा फटका दानवेंना बसू शकतो असे जाणकार सांगतात. परंतु, दानवेंच्या भोकरदन येथे जरांगेंनी सभा घेतली. मात्र, या सभेत जरांगेंनी दानवेंविरोधात एकही शब्द काढला नाही. त्यामुळे जरांगेंचा अप्रत्यक्ष पाठिंबा दानवेंना असल्याचे बोलले जात आहे.
Ground Report : जानकर की बंडू जाधव, परभणीचा ‘बॉस’ कोण? जातीच्या मुद्द्यावर फिरली होती निवडणूक…
जातीय समीकरण सर्वात महत्त्वाचे
एकीकडे मराठा मतांमध्ये विभाजन झाल्यामुळे याचा फटका दानवेंना आणि काही प्रमाणात कल्याण काळे यांना बसू शकतो. केंद्रीय मंत्री गेल्या दोन निवडणुकांमध्ये 55% पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत, परंतु यावेळी दानवे आणि काळे हे दोघेही मराठा उमेदवार आमनेसामने आहेत. त्यामुळे जातीय समीकरण विजयात मोठी भूमिका निभावणार आहे. त्यात मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते आणि सरपंच मंगेश साबळे यांच्यासह वंचितचे भाकर बकले हेदेखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे धनगर, मराठा आदी मतांचं विभाजन होणार आहे. एकूणच काय तर, जालन्यातील सर्वच पक्ष जातीपातीच्या जाळ्यात अडकले आहेत.
Ground Report : नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचं वजन वाढलं… त्यांची मतेच ठरवणार ‘नाशिकचा’ खासदार!
तिरंगी लढतीत दानवेंनी मारली होती बाजी
2019 मधील लोकसभा निवडणुकीत 64.50 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत दोन टक्य्यांनी कमी मतदान झालं होतं. भाजपचे रावसाहेब दानवे, काँग्रेसचे विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे यांच्यात लढत होती. या निवडणुकीत दानवेंना तब्बल 6 लाख 98 हजार 019 मते मिळाली. तर औताडेंना 3 लाख 65 हजार 204 मते मिळाली होती.तर, दानवे 3 लाख 32 हजार 815 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.