Baramati Loksabha ncp Candidate Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Barmati Loksabha) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार Sunetra Pawar) यांचा मतदारसंघात झंझावती प्रचार सुरू आहे. त्यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सुनेत्रा पवार यांनी खडकवासला भागाताली नागरिकांनी संवाद साधला. महायुतीची वज्रमूठ अधिक घट्ट झाली आहे. सर्वजण एकदिलाने काम करत आहेत. यापुढील काळात सर्वांना सोबत घेवून बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करणार असल्याचा शब्द महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिला.
सुनेत्रा पवार यांनी आज खडकवासला मतदारसंघातील वारजे, बावधन आणि कोथरुड भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भेट देत नागरीकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या दौऱ्यात खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, दिलीप बराटे,प्रमोद हिंदुराव, बाबा धुमाळ, राजाभाऊ बराटे, किरण दगडे पाटील, ॲड. मंदार जोशी, मिलिंद वालवडकर, दिलीप वेडे पाटील, गणेश वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, शंकर केमसे, सागर कडू, सुरेंद्र कंधारे, सुर्यकांत भुंडे, अर्चिता जोशी, किर्ती पानसरे, अर्चना चंदनशिवे, शैलेश वेडे पाटील, वैभव मुरकुटे, शंतनू नारके आदी मान्यवर सहभागी झाले होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रत्येक भागात फिरताना काही ना काही समस्या आहेतच. या समस्यांचा मी आढावा घेवून त्या सोडवण्यावर माझा भर असणार आहेत. त्याचवेळी सर्वांना सोबत घेवून बारामती लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
आपल्या सर्वांनाच अजितदादांच्या कामाची पद्धत माहिती आहे. दादा जे काम हाती घेतात ते पूर्णत्वासच नेतात. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या सर्व समस्यांचा निपटारा होईल याबद्दल कोणीही मनात शंका बाळगू नये असेही सुनेत्रा पवार म्हणाले. तसेच येत्या ७ मे रोजी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत
देशाचे नेतृत्व कोणाची हाती द्यायचे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा संधी मिळणार आहे. त्यांना साथ देणारा खासदार सुनेत्रावहिनींच्या रुपात आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन करावे अशा सूचना आमदार भीमराव तापकीर यांनी यावेळी केले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आजच्या दौऱ्यात विविध सोसायट्यांनाही भेटी दिल्या. ठिकठिकाणी सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.