BJP tops in digital advertising : ‘अब की बार, चारसौ पार‘ या नारा देऊन पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास बाळगणाऱ्या भाजपने (BJP) गुगल आणि व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्यूबवरील जाहिरातींसाठी मोठा खर्च केला. राजकीय जाहिरातींसाठी 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा भाजप हा भारतातील पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. मे 2018 पासून आतापर्यंत भाजपच्या डिजिटल प्रचारावर (Digital Promotion) 101 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. गुगलच्या जाहिरात पारदर्शकता अहवालात ही माहिती समोर आली आहे.
उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट
एका वृत्तसंस्थेनुसार, 31 मे 2018 ते 25 एप्रिल 2024 दरम्यान प्रकाशित झालेल्या गुगल जाहिरातींमध्ये भाजपचा वाटा एकूण खर्चाच्या जवळपास 26 टक्के म्हणजे, 390 कोटी रुपये आहे. भाजपची जाहिरात राजकीय जाहिरात म्हणून वर्गीकृत केली जाते. गुगलने राजकीय जाहिराती म्हणून वर्णन केलेल्या एकूण 217,992 कंटेटमध्ये 73 टक्के वाटा भाजपचा आहे. यामध्ये भाजपने 161,000 हून अधिक जाहिरात कंटेट प्रकाशित केला.
उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट
भाजपने जाहिरातींसाठी कर्नाटकात 10.8 कोटी रुपये, उत्तर प्रदेशात 10.3 कोटी रुपये, राजस्थानमध्ये 8.5 कोटी रुपये आणि दिल्लीत 7.6 कोटी रुपये खर्च केले आहेत. एकूणच, गुगल जाहिरातीमध्ये तमिळनाडू हे भाजपसह सर्व राजकीय पक्षांचे लक्ष्य होते. त्यानंतर तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये डिजिटल जाहिरातीचं प्रमाण जास्त पाहायला मिळालं.
दरम्यान, भाजपने डिजिटल प्रचारावर खर्च केलेली रक्कम काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि राजकीय सल्लागार कंपनी इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी (I-PAC) यांनी एकत्रितपणे खर्च केलेल्या रकमेइतकी आहे.
कॉंग्रेसने केला 45 कोटी खर्च
अहवालानुसार, Google Ads, Google Display आणि Video 360 वर राजकीय जाहिरात करण्यासाठी काँग्रेस 45 कोटी रुपये खर्च केले. जाहिरात करण्याच्या बाबतीत कॉंग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस पक्षाने या कालावधीत 5992 ऑनलाइन जाहिराती प्रसिद्ध केल्या, ज्या भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींच्या केवळ 3.7 टक्के आहेत. काँग्रेसची जाहिरात मोहीम प्रामुख्याने कर्नाटक आणि तेलंगणामध्ये होती, जिथे प्रत्येकी 9.6 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
तमिळनाडूचा सत्ताधारी पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) हा Google प्लॅटफॉर्मवर तिसऱ्या क्रमांकाचा राजकीय जाहिरातदार पक्ष आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाने मे 2018 पासून गुगल जाहिरातींवर 42 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये या वर्षी फेब्रुवारीपासून आतापर्यंत राजकीय सल्लागार कंपनी पॉप्युलर एम्पॉवरमेंट नेटवर्कने 16.6 कोटी रुपये खर्च केले आहेत.