Dhairyashil Mohite Patil Attack On RanjitSingh Nimbalkar : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. सातत्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपाच्या फैरी झडत आहे. आता महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी सोलापूरचे विद्यमान खासदार आणि माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) यांच्यावर जोरदार टीका केली. आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आलीये, अशी टीका मोहिते पाटलांनी केली.
Lok Sabha Election : भाऊसाहेब वाकचौरेविरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे; शिर्डीतही राजकीय खेळी
महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पंढरपुरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबोधित केलं. ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या धामधूमीच्या आधी इथं जत्रा भरली होती. एकाने तंबू ठोकला होता. त्या तंबूच्या बाहेर बोर्ड लिहिला होता की, एक रुपयात देव पाहा. जशी आता इथं गर्दी जमली तशीच गर्दी तिथं जमली होती. तंबूवाला रुपया घ्यायचा आणि आत जाणाऱ्याला सांगायचा की, आत जर तुला दोन गाढवं दिसली आणि तू बाहेर जाऊन सांगितलं की, मला गाढवं दिसले. तर पुढच्या जन्मात तू गाढव होशील. माढा आणि सोलापूर लोकसभेतही अशीच परिस्थिती झाली होती. आमच्यावर गाढवाला देव म्हणायची वेळ आली होती, ती चूक आम्ही करून बसलो, अशा शब्दात मोहिती पाटलांनी टीकास्त्र डागलं.
विठ्ठल साखर कारखान्यावर जप्ती, अभिजित पाटलांचे शेतकऱ्यांना वचन; ‘स्वत:ला गहाण ठेवू, पण…’
यासभेला शेकाप नेते अनिकेत देशमुख, रघुनाथराज देशमुख, सक्षणा सलगर आदी नेते उपस्थित होते.
यावेळी अभिजित पाटील म्हणाले, निवडणुका सुरू असताना विठ्ठल साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कारवाईमुळं कोणताही काळजी करू नये. शेतकऱ्यांची सर्व उसाची बिले दिले जातील. मी कारखान्याच्या सर्व सभासदांना वचन देतो की, वेळ पडली तर स्वत:ला गहाण ठेवेल, कोणतीही किंमत मोजावी लागली, काहीही निर्णय घ्याला लागला तरी तो घेऊ, पण शेतकऱ्यांचा हा विठ्ठल साखर कारखाना वाचवू, असं पाटील म्हणाले.