Lok Sabha Election : भाऊसाहेब वाकचौरेविरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे; शिर्डीतही राजकीय खेळी
Shirdi Loksabha Election Bhausaheb Rajaram Wakchaure : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) रणसंग्राम जोरदार सुरू आहे. त्यात अनेक राजकीय खेळ्या केल्या जातात. त्यात नामसाधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात उतरविले जाते. राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात सारख्या नावाचे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघामध्ये सारखे नावे असलेले पक्षाचे व अपक्ष उमेदवार आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे नीलेश ज्ञानदेव लंके अशी लढत होत आहे. लंके यांचे तुतारी चिन्ह आहे. तर अपक्ष म्हणून नीलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नीलेश साहेबराव लंके हेही पारनेर तालुक्यातील आहेत. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातही (Shirdi LoK Sabha) एकाच नावाचे दोन उमेदवार आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (Bhausaheb Rajaram Wakchaure) हे उमेदवार आहेत. तर महायुतीकडून खासदार सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. परंतु वाकचौरे नावाचा दुसरा उमेदवारही अपक्ष म्हणून रिंगणात उतरविला आहे. भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहे. तर भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. दोन्ही वाकचौरे हे अकोले तालुक्यातील आहेत. त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे नावाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत.
उमेदवारांपेक्षा जास्त मत NOTA मिळाली तर काय होणार ? निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
अनेकदा निवडणुकीत सारखे नाव असलेले उमेदवार असल्यास मतदारामध्ये गोंधळ उडतो. त्यामुळे विरोधक उमेदवाराकडून अशा खेळ्या केल्या जातात. तर कधी अपक्ष उमेदवार आपल्या नावाची चर्चा होण्यासाठी असे करतात.
Lok Sabha elections : राज्यात मतदानाचा टक्का घटला! फटका कुणाला बसणार?
शिर्डीत अनेक अपक्ष उमेदवार
अर्ज छाननीमध्ये 31 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर नऊ उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले
. अर्ज वैध ठरलेले उमेदवार – भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे), लोखंडे सदाशिव किसन (शिवसेना), चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष), अभिजीत अशोकराव पोटे (अपक्ष), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी), बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष), अॅड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष) , अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी), गंगाधर राजाराम कदम (अपक्ष), भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष) , प्रशांत वसंत निकम (अपक्ष), खरात नचिकेत रघुनाथ (अपक्ष), संजय हरिश्चंद्र खामकर (बळीराजा पार्टी), राजेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), रविंद्र कलय्या स्वामी (अपक्ष), खाजेकर विजयकुमार गोविंदराव (अपक्ष) व सना मोहंमद अली सय्यद (अपक्ष) असे आहेत.