स्वबळावर निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार, मंत्री गुलाबराव पाटील स्पष्टच म्हणाले
Gulabrao Patil : राज्यात लवकरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामुळे आता प्रत्येक पक्ष जोरदार तयारी
Gulabrao Patil : राज्यात लवकरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामुळे आता प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. यातच महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याची सध्या चर्चा जोराने राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तर दुसरीकडे आता शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरात तयारी करण्यात येत आहे. काल पाचोरा येथे काल शिवसेनेचा निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षबांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
मेळाव्याला परिसरातील हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. भगव्या पताक्यांनी सजलेले मैदान घोषणांनी दुमदुमून गेले. यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले की, “शिवसेना ही सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढणारी पक्षसंस्था आहे. आपल्यावर कितीही संकटे आली तरी आपण शिवसेनेच्या विचारांपासून मागे हटणार नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा हीच आमची खरी ताकद आहे.”
पालकमंत्री पाटील यांनी राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनबांधणी अधिक मजबूत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विश्वविजेते होताच भारतीय संघावर होणार पैशांचा वर्षाव; बीसीसीआय देणार कोटींचे बक्षीस
स्थानिक पातळीवर स्वबळावर लढणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केले आहे. या बाबतीत आपण आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगुन पुढील निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
