Bhausaheb Wakchaure : निवृत्त अधिकारी ते शिर्डीचा माजी खासदार, ठाकरेंचे ‘भाऊसाहेब’ कोट्याधीश…

Bhausaheb Wakchaure : निवृत्त अधिकारी ते शिर्डीचा माजी खासदार, ठाकरेंचे ‘भाऊसाहेब’ कोट्याधीश…

Bhausaheb Wakchaure : सरकारी खात्यात सेवा बजावल्यानंतर शिर्डी संस्थानचे अधिकारी आणि मग राजकारणात पाऊल टाकणारे भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून (Shirdi Loksabha Election) पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून रिंगणात उभे आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure Property) यांनी उमेदवार अर्ज दाखल केला आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेले भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा जनता साथ देऊन विजयी करणार असल्याचा सूर सध्या शिर्डीकरांकडून ऐकण्यात येत आहे. अशातच आता ठाकरेंचे शिलेदार समजले जाणारे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून नेमकी संपत्ती कितीये? सेवानिवृत्तीनंतरची त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली? याबाबत सविस्तर पाहुयात…

मुख्यमंत्र्यांनी विखे कुटुंबावर उधळली स्तुतीसुमन! म्हणाले, कुणीही आलं तरी यांची पाळमुळ…

शासकीय सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर सुरुवातीला वाकचौरे यांनी शिर्डी साईबाबा मंदिरात कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांच्या अधिपत्याखाली शिर्डी संस्थान असताना शिर्डीत अनेक विकासकामे झाल्याचं पाहायला मिळतं. 2008 साली त्यांनी अरविंद सावंत आणि निलम गोर्हे यांचं बोट धरुन शिवसेनेत प्रवेश केला. आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून उमेदवारीही मिळाली. त्यावेळचे काँग्रेस-राष्ट्रवादी-आरपीआय आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांचा वाकचौरेंनी मोठ्या मताच्या फरकाने पराभव करत लोकसभेवर निवडून गेले. आठवलेंचा पराभव केल्याने वाकचौरेंची देशभरात ओळख निर्माण झाली.

मोठी बातमी ! प्रचारसभेच्या वेळी उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला

भाऊसाहेब वाकचौरे कोट्याधीश कसे?
वाकचौरे यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्ता एकूण 1 कोटी 39 लाख रुपयांची आहे. तर पत्नीच्या नावावर स्थावर आणि जंगम मिळून 3 कोटी 55 लाखांची संपत्ती आहे. 29 लाख 50 हजार रुपयांचं 50 तोळे सोने आणि 3 लाख 62 हजार हजारांची 5 किलो चांदी स्वत:कडे आहे. तर पत्नी सरस्वती वाकचौरे यांच्याकडे 29 लाख 50 हजार किमतीचं 50 तोळे सोनं आणि 2 लाख 81 हजारांची अडीच किलो चांदी आहे. वाकचौरे कुटुंबियांकडे 21 लाख रुपयांचे 2 चारचाकी वाहने तर 1 लाख 50 हजार किमतीचे शेअर्स आणि 5 लाखांची मुदत ठेवही आहे. यासोबतच 1 कोटी 24 लाख रुपयांची उसनवारीही असल्याचा उल्लेख भाऊसाहेब वाकचौरेंनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

मोठी बातमी : …अन्यथा सलमान खानसारखं प्रकरण करू; जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगची धमकी

तसेच भाऊसाहेबांकडे 23 लाख 52 हजार किमतीची जंगम मालमत्ता तर पत्नीकडे 46 लाख 8 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच राहतामधील निमगाव कोराळेत 1 एकर शेतीसह पत्नीच्या नावावर नेवाशातील कांगोणी आणि कोपरगावमधील चांदेकसारेत शेती अन् शिर्डी, निंबळकमध्ये प्लॉट असल्याचं वाकचौरे यांनी नमूद केलं आहे.

वाकचौरे यांनी 2014 च्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना शिवसेनेने पुन्हा दिली मात्र, तरीही वाकचौरेंनी काँग्रेसकडे जाणे पसंत केले आणि मोदी लाट असतानाच पराभवाला सामोरे गेले. लोकसभेत अपयश आल्याने त्यांनी 2019 मध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली मात्र, तिथेही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. अशातच शिवसेनेत फुट पडल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंचा हात धरला आणि शिवसेनेत प्रवेश केला. यंदाच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा ठाकरे गटाकडून संधी देण्यात आलीयं.

दरम्यान, 2009 मध्ये दिग्गज नेत्याचा पराभव करीत लोकसभेत गेलेले भाऊसाहेब वाकचौरे हे यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचाही पराभव करतील का हे आता 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube