इलेक्टोरल बाँड्स काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी, विरोधकांचे आरोप खोटे; मोदींचे टीकास्त्र

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha election) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. इलेक्टोरल बाँड्सवरून विरोधी पक्षांनी भाजपवर (BJP) टीका केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड्स (Electoral Bonds) योजना असंविधानिक असल्याचं सांगितलं. दरम्यान, यावर आता पंतपप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. आतापर्यंतचा विकास फक्त ट्रेलर; माझ्याकडे 25 वर्षाचा प्लॅन तयार, […]

VIDEO: पाकिस्तानकडील अणुबॉम्बवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास स्टाईलने उत्तर, मी स्वतः लाहोर जावून तपासून आलोय...

PM Narendra Modi

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha election) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. इलेक्टोरल बाँड्सवरून विरोधी पक्षांनी भाजपवर (BJP) टीका केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड्स (Electoral Bonds) योजना असंविधानिक असल्याचं सांगितलं. दरम्यान, यावर आता पंतपप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं.

आतापर्यंतचा विकास फक्त ट्रेलर; माझ्याकडे 25 वर्षाचा प्लॅन तयार, PM मोदींचा दावा

एएनआय या वृत्त संस्थेथा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखत दिली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, आपल्या देशाच्या विकासासाठी पुढील 25 वर्षांचा आराखडा तयार आहे. आतापर्यंत झालेला विकास हा फक्त ट्रेलर होता. 10 वर्षांपैकी 2 वर्षे मला कोरोना संकटाचा सामना करावा लागला. तरीही आम्ही कॉंग्रेसपेक्षा चांगलं काम केलं. देश मजबूत करण्यासाठी मी काम करत राहिलो. मी गेल्या दोन वर्षांपासून 2047 साठी काम करत आहे, असं मोदी म्हणाले.

लोकसभा रणांगण! महायुती की आघाडी? सत्यजित तांबेच्या मनात काय?    

इलेक्टोरल बाँड्सवरून होत असलेल्या आरोपांविषयी विचारलं असता ते म्हणाले की, घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणतीही कमतरता असू शकत नाही, असे आम्ही कधीच म्हटले नाही. मात्र विरोधी पक्ष इलेक्टोरल बाँड्सवरून देशात खोटंनाटं बोलत आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी निवडणूक बाँड्स योजना आहे. तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईनंतर देणगी देणाऱ्या 16 कंपन्यांपैकी 37 टक्के भाजपाला आणि 63 टक्के रक्कम भाजपला विरोध करणाऱ्या पक्षांकडे गेली आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, संसदेत इलेक्टोरल बाँड्स विधेयक मंजूर झाले तेव्हा त्यावर चर्चा झाली होती. आता जे या योजनेला विरोध करत आहेत, तेव्हा त्यांनीच त्याचं समर्थन दिलं. इलेक्टोरल बाँड्स होते म्हणून आपल्याला पैशाचा माग काढता आला. म्हणजे, कोणत्या कंपनीने दिले? ते कसे दिले गेले? कुठे दिले होते? इलेक्टोरल बाँड नसेल तर पैसा कसा आला आणि कुठे गेला याचा तपास लागणार नाही.

ते म्हणाले, निवडणुकीत खर्च होतो. हे प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. निवडणुकीच्या काळात सर्वच पक्ष आणि उमेदवार खर्च करतात. यासाठी लोकांकडून पैसे दिले जातात. पण आपल्या निवडणुका काळ्या पैशापासून मुक्त कशा होतील, हे पाहावे लागेल.

Exit mobile version