आतापर्यंतचा विकास फक्त ट्रेलर; माझ्याकडे 25 वर्षाचा प्लॅन तयार, PM मोदींचा दावा
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha election) रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे लोकांसमोर मांडले आहेत. आपापल्या पक्षाचं काम राजकीय पक्ष जनतेसमोर घेऊन जात आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) आपल्या दहा वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. हा फक्त ट्रेलर असल्याचं मोदी म्हणाले.
लोकसभा रणांगण! महायुती की आघाडी? सत्यजित तांबेच्या मनात काय?
आज एका वृत्त वाहिनीला मोदींनी मुलाखत दिली. यावेळी बोतलांना मोदी म्हणाले, आपल्या देशाच्या विकासासाठी पुढील 25 वर्षांचा आराखडा तयार आहे. आतापर्यंत झालेला विकास हा फक्त ट्रेलर होता. आगामी काळात आणखी महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. मतदारांनी २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या ५-६ दशकांच्या कामाची आणि भाजपच्या १० वर्षांच्या कामाची तुलना करावी, त्यांच्यासाठी ५-६ दशकांचे काम हे मोठं मैदान आहे. माझं काम तर फक्त 10 वर्षांचे आहे. कोणत्याही क्षेत्राची तुलना करा. आम्ही कुठंचं कमी राहिलो नाही, असा दावा मोदींना केला.
मिठाचा खडा पडलाच! महाविकास आघाडीत पहिली बंडखोरी, विशाल पाटलांनी भरला अपक्ष अर्ज
ते म्हणाले, 10 वर्षांपैकी 2 वर्षे मला कोरोना संकटाचा सामना करावा लागला. तरीही आम्ही वेग, स्केल, सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक विकास या पॅरामीटवर कॉंग्रेसपेक्षा चांगलं काम केलं. देश मजबूत करण्यासाठी मी काम करत राहिलो. माझे सरकार त्या दिशेने काम करत आहे.
माझ्या मनात मोठ्या योजना आहेत, मी गेल्या दोन वर्षांपासून 2047 साठी काम करत आहे. त्यासाठी मी अधिकाऱ्यांची टीम तयार केली. मी एक डॉक्यूमेंट रुपाने तयार करत आहे. निवडणुकीनंतर संबंधित डॉक्यूमेंट पाठवल्या जातील. राज्यांना काय वाटते यावर मी प्रतिक्रिया घेईन. यानंतर मी नीती आयोगात प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. त्यावरून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मोदी यांनी सांगितले
मोदी म्हणाले, माझे निर्णय कुणाला घाबरवणारे नाहीत. माझे निर्णय लोककल्याणासाठी आहेत. मी शक्य तितके चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. पण मला अजून खूप काही करायचे आहे. प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न कसे पूर्ण होईल हे मी पाहतो. आजवरचं काम फक्त ट्रेलर आहे, मला आणखी खूप काही काम करायचं आहे, असं मोदी म्हणाले.
सगळ्यांना पश्चाताप होईल – मोदी
इलेक्टोरल बाँड्सवरून विरोधी पक्षांनी भाजपवर टीका केली होती. निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्स योजना असंविधानिक असल्याचं सांगितलं. याविषयी बोलतांना मोदी म्हणाले की, इलेक्टोरल बाँड्स होते म्हणून आपल्याला पैशाचा माग काढता आला. म्हणजे, कोणत्या कंपनीने दिले? ते कसे दिले गेले? कुठे दिले होते? म्हणून मी म्हणतो, जर आपण प्रामाणिकपणे विचार केला तर सगळ्यांना पश्चाताप होईल, असं मोदी म्हणाले.