Vijay Shivtare on Supriya Sule : एकीकडे पवार घराण्यातच बारामती लोकसभेवरून टफ फाईट सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या नणंद भावजयांमध्ये बारामती लोकसभेवरून चुरशीची लढत होत आहे. तर काल शिवसेना नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) आपण बारामती लोकसभा लढणार असं म्हणत पवार कुटुंबियांवर जोरदार टीका केली. तर आज त्यांनी सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका केली. सुप्रिया सुळेंनी १५ वर्षात एक रुपयाचं तरी काम केलं का? त्या फक्त सेल्फी काढत फिरत असतात, अशी घणाघाती टीका शिवतारेंनी केली.
त्यावेळी जातीचे रंग थोडे फिकट पण… धुळवडीनिमित्त कुशल बद्रिकेची भावूक पोस्ट
आज विजय शिवतारेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, महायुतीला का वाटतं आम्ही पन्नास वर्ष एकाच पवार घराण्याला मतदान करावं? आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनाच मतदान करावं का? गेल्या १५ वर्ष सुप्रिया सुळे ह्या खासदार आहेत. त्यांनी या पंधरा वर्षात मतदारसंघात एक तरी काम केलं? त्यांनी एका रुपयाचंही काम केलं नाही. निव्वळ सेल्फी काढत फिरायचं, त्यानं कामं होत नाहीत.. संसदरत्न होऊन देखील त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी काही केलं नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
ISRO PSLV Module 3 : इस्रोचं रॉकेट अंतराळात कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल
सेल्फी घेऊन किंवा संसदरत्न होऊन कामं होत नाहीत. गुंजवणी प्रकल्प करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले. त्यांचे भाऊ महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री असताना त्यांनी काय प्रयत्न केले? असे म्हणत शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.
दरम्यान, काल शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र महायुतीने महादेव जानकर यांना उमेदवारी देणार असल्याचं स्पष्ट केलं. त्याविषयी विचारले असता शिवतारे म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. पण, मला एक कळत नाही की, महायुतीकडून सुनेत्रा पवार लढणार असल्याचं बोलल्या जातं. त्यांचा प्रचार सुरू होता. मग अजानक महादेव जानकर यांचं नाव का चर्चेत येतंय. शेवटी कोणीतरी महायुतीकडून लढणार आहे. मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून उभा राहणार आहे. विजय शिवतारे यांचे नाव महत्त्वाचे नाही. जी पवारांविरुध्द जनता बारामती मतदारसंघात आहे, त्यांचं प्रतिनिधित्व मी करत असल्याचं शिवतारे म्हणाले.