Download App

निवडणुकीत सुमार कामगिरीमुळेच फडणवीचांचे राजीनाम्याचे नाटक; कॉंग्रेसचे टीकास्त्र

राज्यातील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार झालीये, याची जाणीव फडणवीसांना झाली असून ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली.

Atul Londhe on Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) राज्यात महायुतीचा (Mahayuti) धुव्वा उडाला आहे. 45 प्लसचा नारा देणाऱ्या भाजपला (BJP) दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. एनडीएला फक्त 19 तर भाजपला 9 जागा मिळाल्या. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यावरून आता कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.

‘All Eyes on Rafah’ नंतर ‘All Eyes on Nitish’ सोशल मीडियावर होत आहे ट्रेंड, ‘हे’ आहे कारण 

राज्यातील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार झालीये, याची जाणीव फडणवीसांना झाली असून ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली.

लोंढे म्हणाले की, राज्यात असंवैधानिक सरकार सुरू आहे. हे खुद्द फडणवीस यांनीच सांगितले आहे. मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असं म्हणत दोन्ही पक्ष फोडून आलो, हेही त्यांनीच सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून मित्रांना दिले आणि त्या पक्षाचे निवडणूक चिन्हही काढून घेतले. सरकारी यंत्रणेमार्फत भाजपने केलेले पक्ष फोडाफोडीचे राजकारण राज्यातील जनतेला आवडले नाही. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष होता आणि निवडणुकीत संधी मिळताच जनतेने देवेंद्र फडणवीस आणि भाजपला धडा शिकवला, अशी टीका लोंढेंनी केलं.

Eknath Shinde : ‘पराभव ही सामुहिक जबाबदारी, एका निवडणुकीने सर्वकाही संपत नाही…’ 

शिवसेना हा उद्धव ठाकरेंचा तर राष्ट्रवादी हा शरद पवारांचा पक्ष असल्याचं जनतेनं दाखवून दिलं, असंही लोंढे म्हणाले.

पुढं बोलतांन ते म्हणाले की, भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेऊन फडणवीस राजीनामा देत असतील तर खरी जबाबदारी तर मोदींवर होती. मोदींही राजीनामा देतील का? कारण भाजपने ही निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावरच लढवली, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

काय म्हणाले फडणवीस?

पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस सर्व जबाबदारी स्वीकारत आहेत. आता मला विधानसभेसाठी पूर्णपणे उतरायचं आहे. मला सरकारमधून मुक्त करा, असं फडणवीस म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज