Elections Results : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) मतमोजणी सुरू झाली असून आता काही वेळाने निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात विदर्भातील नागपूर, वाशिम-यवतमाळ, अमरावती, आणि चंद्रपूर लोकसभेची लढत महत्त्वाची मानली जात आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यात थेट लढत आहे.
मुंबईच्या सहा जागांचा कौल, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? जाणून घ्या एका क्लिकवर…
नितीन गडकरी नागपुरात आघाडीवर
नितीन गडकरी यांनी नागपुरातून आघाडी घेतली आहे. गडकरींना आतापर्यंत 90899 मते मिळाली. तर कॉंग्रेसचे विकास ठाकरे यांना 65411 मते मिळाली. विकास ठाकरे मागे पडल्याचे दिसून येत आहे.
योगेश लांजेवार – बसप – 1901
किवीनसुका सुरेंद्र सुर्यवंशी – देजनहित पार्टी- 270
चंद्रपुरात भाजपला धक्का
चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 84628 मते मिळाली आहेत. त्या आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार मागे पडल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुनगंटीवर यांना 49549 मते मिळाली असून वंचितच्या राजेश बेलेंना 2356 मते मिळाली.
नवनीत राणा अमरावतीत पिछाडीवर
विदर्भातील सर्वात हॉट मतदारसंघ असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यात काट्याची लढत सुरू आहे. राणांना 42104 मते मिळाली आहेत. तर माविआचे उमेदवार बळवंत वानखडे 42853 मते मिळालीत. दिनेश बुब (प्रहार) 8432 मते तर आनंदराज आंबेडकर यांना (रिपब्लित सेना) – 1282 मते मिळाली.
अकोल्यात अभय पाटील आघाडीवर
अकोल्यात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आघाडीवर आहेत. त्यांना 60068 मते मिळाली. तर भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 55289 मते मिळाली. आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 42220 इतकी मते मिळाली.
वर्ध्यात अमर काळे आघाडीवर
वर्ध्यात भाजपचे रामदास तडस यांना आतापर्यंत 21789 तर महाविकास आघाडीचे अमर काळे यांना 23125 मते मिळाली आहे. अपक्ष उमेदवार आसीफ यांना 872 मते मिळाली.
भंडारा-गोंदियामध्ये प्रशांत पडोळे आघाडीवर
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना आतापर्यंत 6198 मते मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.प्रशांत पडोळे यांना 56406 मते मिळाली आहेत.
कुंभलकर संजय – बसपा – 2546
संजय केवड – वंचित – 1439
Kalyan Lok Sabha Result 2024 : श्रीकांत शिंदे पुन्हा बाजी मारणार, 40 हजार मतांनी पुढे
बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडकरांचि पिछाडी
बुलढाणमध्ये प्रतापराव जाधव पुढे दिसत आहेत. त्यांना आतापर्यंत 45167 मते मिळाली आहेत. तर उबाठाचे नरेंद्र खेडेकर यांना 35262 मते तर अपक्ष उमेदवार असलेले रविकांत तुपकर यांना 25598 मते मिळाली. वसंतराव मगर (वंचित) – 9437 यांना मते मिळाली असून महाराष्ट्र विकास आघाडीचे असलम शाह हसन शाह यांना 933 मते मिळाली आहेत.
रामटेकमध्ये कॉग्रेस आघाडीवर
श्याकुमार बर्वे (कॉंग्रेस) 64523
राजू पारवे (शिवसेना) 54617
संदीप मेश्राम – बसपा – 3524
किशोर गजभिये- अपक्ष – 1943
रोशन गजभिये – गोंडवाणा गणतंत्र पार्टी- 1691
यवतमाळ-वाशिममध्ये संजय देशमुख आघाडीवर
संजय देशमुख (उबाठा) – 112160
राजश्री पाटील (शिवसेना) – 83376
हरिभाऊ राठोड बसपा -3447
गडचिलोरीमध्ये भाजपची पिछाडी
नामदेव किरसान – कॉंग्रेस – 40058
अशोक नेते – भाजप – 34868
योगेश गोन्नाडे – बसपा – 939