Narendra Modi On MIM : हैदराबाद लोकसभा मतदारसंघात (Hyderabad Lok Sabha 2024) भाजप (BJP) उमेदवार माधवी लता (Madhavi Lata) यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमआयएम (MIM) आणि काँग्रेस (Congress) पक्षावर जोरदार टीका केली आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, यावेळी तेलंगणात लोक एमआयएम, काँग्रेस आणि बीआरएसला (BRS) मत देणार नाही. या लोकसभा निवडणुकीत लोक फक्त भाजपला मत देणार. 4 जून रोजी देश जिंकणार आणि भारतचे विरोधी पराभूत होणार आहे. सीएएला विरोध करणारे, वोट जिहादबद्दल बोलणारे 4 जून रोजी पराभूत होणार असं नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत भ्रष्टाचारासह कधीच पुढे जाऊ शकत नाही, भ्रष्टाचार करणाऱ्या पक्ष कधीच भारताचा विकास करू शकत नाही. हैदराबादमध्ये 2014 पूर्वी अनेक बॉम्बस्फोट होत होते मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट होत नाही असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेस तुमची संपत्ती दुसऱ्यांना देण्याचा विचार करत आहे. शाहजादे यांचे गुरु देशात राहणाऱ्या नागरिकांना देशाचे नागरिक समजत नाही. असं म्हणत त्यांनी सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
हैदराबादमध्ये एमआयएमला सूट देण्यात आली आहे. एमआयएममुळे काँग्रेस आणि बीआरएस हैदराबाद मुक्त दिवस साजरा करत नाही मात्र भाजपकडून आता 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्त दिवस साजरा करण्यात येणार आहे.
छत्तीसगडमध्ये मोठं ऑपरेशन! चकमकीत बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलांची कामगिरी
हैदराबाद लोकसभा मतदारसंघात लोकांना काहीच सुविधा मिळत नाही मात्र काँग्रेस आणि बीआरएस तुमची अडचण समजू शकत नाही. यामुळे यावेळी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार माधवी लता यांना निवडून द्या असा आवाहन त्यांनी केला.