Download App

सीएम शिंदेंना धक्का, नाशिकमध्ये भाजप देणार भुजबळांच्या कुटुंबातील उमेदवार?

  • Written By: Last Updated:

Nashik Lok Sabha 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीमध्ये (Mahayuti) तिढा कायम असल्याने या जागेवरून महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माघार घेतल्यानंतर शिंदे गटाचे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती मात्र अद्याप त्यांच्या नावाची घोषणा महायुतीकडून करण्यात आली नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी महायुतीकडून प्रबळ उमेदवार म्हणून अन्य पर्यायांचा विचार केला जात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे सांगत 3 इच्छुक उमेदवारांची नावे सांगितली होती.

मात्र आता पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट आल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. माहितीनुसार, नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ नसल्यास एक सर्वसमावेशक आणि प्रबळ उमेदवार म्हणून अन्य पर्यायांचा विचार करण्यात यावा अशी मागणी भाजप (BJP) नेत्याकडून होत आहे. यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सार्वजनिक कार्यक्रमात यापूर्वीही नितीन गडकरींना अनेकदा आलीय भोवळ, जाणून घ्या नेमका त्रास काय ?

या मतदारसंघात छगन भुजबळ नसल्यास किमान त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणी सदस्य अथवा महिला प्रभावी उमेदवाराला संधी देण्यात यावी अशी मागणी महायुतीच्या काही नेत्यांकडून होत आहे. यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबीयातील अन्य सदस्याला उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Champions Trophy 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? बीसीसीआय म्हणतो, आमचे संबंध …

follow us