बीड : लोकसभा निवडणुकांसाठी 20 मे रोजी नाशिकसह अन्य मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, अद्यापही काही मतदारसंघातील जागा वाटपावरून महयुतीत एकमत झालेले नाही. त्यातील एक चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली जागा म्हणजे नाशिकची. या जागेवर भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसेंचे (Hemant Godse) नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. या सर्व उमेदवारीच्या गदारोळात पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) तुम्ही प्रीतम मुंडेंची काळजी करू नका आपण त्यांना नाशिकमधून उभं करू असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, गोडसे आणि भुजबळांना डच्चू देत महायुतीकडून प्रीतम मुंडेंना खरचं उमेदवारी मिळणार का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्या काल (दि.24) बीडमध्ये जाहीर सभेत बोलत होत्या. (Pankaja Munde On Pritam Munde And Nashik Loksabha Seat)
परभणीत हायहोल्टेज ड्रामा! चिडलेल्या जानकरांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, नेमकं काय घडलं?
भुजबळांच्या माघारीनंतर नव्या उमेदवाराचा शोध
नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ इच्छूक होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने येथे पुन्हा नव्याने उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. एकीकडे जरी, भुजबळांनी माघार घेतली असली तरी, राष्ट्रवादीने अद्यापही नाशिकच्या जागेवरून दावा सोडलेला नाही. हे सर्व घोंगडं भिजत असतानाच आता बीडमधील सभेत पंकजांनी प्रीतम मुंडेंची काळजी करू नका त्यांना आपण नाशिकमधून उभं करू असे म्हटले आहे. त्यामुळे भुजबळांच्या माघारीनंतर महायुती दुसरा ओबीसी चेहऱ्याचा शोध घेत आहे का? आणि त्यासाठी म्हणूनच प्रीतम मुंडेंच्या नावाचा विचार होतोय का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
परभणीत हायहोल्टेज ड्रामा! चिडलेल्या जानकरांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, नेमकं काय घडलं?
शिंदेंशी भेटीगाठी पण गोंडसे वेंटिंगवरच
नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंचे नाव आघडीवर असून, गोडसेंनी उमेदवारीबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनेकदा भेटी घेतल्या. मात्र, यानंतरही गोडसेंच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नसून, ते घोषणेच्या प्रतिक्षेतच आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
प्रीतम ताईला विस्थापित होऊ देणार नाही – पंकजा मुंडे
बीड लोकसभेसाठी प्रीतम मुंडेंऐवजी पंकजांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता कसं वाटतंय असा प्रश्न पत्रकारांनी पंकजा मुंडेंना विचारला होता. त्यावर उत्तर देताना “आता खूप प्रीमॅच्यूर आणि हुरहुर वाटत असल्यासारखं वाटतंय असे पंकजा म्हणाल्या होत्या. नवीन नोकरीच्या मुलाखतीला जाताना जसं वाटतं. लग्नाच्या बोहल्यावर चढताना जसं वाटतं अगदी तसंच वाटतंय”, अशी मिश्लिक प्रतिक्रियाही पंकजा मुंडे त्यावेळी दिली होती.
छगन भुजबळांनी नाशिकचं मैदान सोडलं, लोकसभा निडणुकीतून माघार; वाचा नक्की काय घडलं?
यावेळी त्यांनी आपल्या बहीणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतम ताईला आपण विस्थापित होऊ देणार नसल्याचा शब्द दिला होता. त्यात आता त्यांना बीडच्या सभेत तुम्ही प्रीतम मुंडेंची काळजी करू नका त्यांना आपण नाशिकमधून उमेदवारी देऊ असे मोठे विधान केले आहे. त्यामुळे पंकजांनी दिलेला विस्थापित होऊ न देण्याचा शब्द खरा ठरतोय का? आणि खरचं महायुतीकडून प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी जाहीर होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.