Download App

दक्षिण मुंबईनंतर शिंदेंकडून नाशिकही काबीज, लोकसभेसाठी गोडेसेंचं नाव जवळपास निश्चित; आज घोषणा?

आत्तापर्यंत भाजपने 27 शिवसेना शिंदे गट 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 5 जागांवर उमेदवार घोषित केलेले आहेत.

  • Written By: Last Updated:

मुंबई : महायुतीत मुंबईतील दक्षिण मुंबई स्वतःकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आल्यानंतर आता शिंदेंना नाशिकची जागादेखील लोकसभेसाठी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. नाशिकच्या जागेवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांनीही दावा ठोकला होता. त्यामुळे येथील उमेदवारीबाबत पेज निर्माण झाला होता. मात्र, आता गोडसेंचे नाव निश्चित झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेला तिढा सुटल्यात जमा झाला आहे. गोडसेंच्या नावाची आज घोषणा केली जाऊ शकेत असेही सांगितले जात आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी गोडसे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं मुंबईला फेऱ्या मारत होते. अखेर कालच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गोडसेंच्या मुंबईवाऱ्या फळाला लागल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र दिनी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; गल्लीपासून-दिल्लीपर्यंत LPG सिलिंडर झाले स्वस्त

नाशिकच्या जागेसाठी महाजनांच्या बैठका

लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे प्रचारसभांचा धडाका सुरू असून, राज्यातील काही जागांवरून महायुतीत तिढा आहे. त्यात नाशिक, ठाण्याचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. मात्र, आज या दोन्ही जागांवर उमेदवार घोषित होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला असताना महायुतीकडून गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. नाशिकमधून नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून खलबतं सुरू होते. काल (दि.30) दिवसभर मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकांचा धडाका लावला होता. त्यानंतर आता अखेर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून आज दिवसभरात त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातच लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात का? पवारांनी उघड केली भाजपची खेळी

लोकसभा निवडणुक जाहीर होऊन अनेक दिवस उलटल्यानंतही महायुतीत अद्याप जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत होतं. आत्तापर्यंत भाजपने 27 शिवसेना शिंदे गट 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 5 जागांवर उमेदवार घोषित केलेले आहेत. तर नाशिक आणि मुंबईच्या जागांच्या अद्याप शिक्कामोर्तब झालेले नव्हते. अखेर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदे यांनीच मिळवली असून यामिनी जाधव यांना उमेदवारीही जाहीर केली आहे.

शांत संयमी गोडसे उमेदवारीसाठी आक्रमक 

नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे तसे शांत आणि संयमी समजले जातता. आधी मनसे आणि आता शिवसेना अशा पक्षांमध्ये काम करुनही गोडसे इतर आमदार-खासदारांप्रमाणे कधी आक्रमक झालेले ऐकीवात नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते नाशिकची जागा शिवसेना मिळावी यासाठी आक्रमक झालेले दिसून येत होते. नाशिकच्या जागेवर आपल्याच नावाची घोषणा व्हावी यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन ठिय्या दिला होता. दादा भुसे आणि गोडसे यांच्यातील सुप्त संघर्ष नवीन नाही. पण नाशिकच्या जागेसाठी भुसेंनीही गोडसेंसोबत शिंदेंच्या घरी ठिय्या देत गोडसेंना साथ दिली होती.

follow us