Download App

नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट, शांतीगिरी महाराजांनी केला शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल

आता अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) अर्ज भरतांना शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरला आहे.

  • Written By: Last Updated:

Shantigiri Maharaj : छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगत माघार घेतली होती. त्यानंतर हेमंत गोडसे (Hemant Godse) नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येतं होतं. मात्र, नाशिक लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नाही. अशातच आता अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) अर्ज भरतांना शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरला आहे.

तुमच्या कौटुंबिक वादामुळे महाराष्ट्र का उध्वस्त करता? पंतप्रधान मोदींचा ठाकरे-पवारांवर घणाघात 

शांतीगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आपण नाशिकमधून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आपल्याला उमेदवारी दिल्यास आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केली होता. त्यानंतर आज गोदा घाट परिसरातील गौरी पटांगणात शांतीगिरी महाराजांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख केला आहे. त्यामुळं नाशकात खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरेंची टीका म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार; फडणवीसांचे टीकास्त्र 

शांतीगिरी महाराज यांनी यापूर्वीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शांतीगिरी महाराज यांचे एकूण चार अर्ज आले आहेत. आज आणखी एक अर्ज दाखल केला. शांतीगिरी महाराजांनी या अर्जासोबत शिवसेनेचा एबी फॉर्म जोडलेला नाही. त्यामुळे अजूनही संभ्रम आहे. मात्र, तसे झाल्यास भुजबळ आणि गोडसे या दोघांनाही मोठा धक्का बसणार आहे. त्यांनी भरलेल्या फॉर्ममुळे शांतीगिरी हे महायुतीचे उमेदवार तर होणार नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली.

कोण आहेत शांतीगिरी महाराज?

नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांचा मोठा अनुयायी वर्ग आहे. त्यामुळेच निवडणुक फिरवण्याची ताकद त्यांच्यात आहे. शांतीगिरी महाराज यांनी 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवली नव्हती. असे असताना त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.

 

 

follow us