Download App

एनएलसी इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 1 लाख रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज ?

NLC Recruitment 2024: एनएलसी इंडिया लिमिटेडने (NLC India Limited) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

  • Written By: Last Updated:

NLC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही केंद्र सरकारची नोकरी असणार आहे. एनएलसी इंडिया लिमिटेडने (NLC India Limited) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती अंतर्गत ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स एक्झिक्युटिव्ह (Maintenance Executive) ही पदे भरली जाणार आहे. दरम्यान, या भरती अंतर्गत नेमकी किती पदे भरली जाणार आहेत? या नोकरीसाठी कोण अर्ज करू शकतं? याच विषयी जाणून घेऊ.

Neha Malik : नेहा मलिकने जिम वेअर आउटफिट घालून दाखवल्या नादखुळा अदा… 

पदांची संख्या –
ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी एकूण 24 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. तर मेंटेनन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी एकूण 12 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. एक्सिक्युटिव्ह पदासाठी अशा एकूण 36 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

दोनदा प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत येणाऱ्या Ayushmann Khurrana लावणार TIME100 गालाला हजेरी 

शैक्षणिक पात्रता
ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी केमिकल/C&I/E&I/ECE/इलेक्ट्रिकल/ईईई/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

मेंटेनन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल/केमिकल/C&I/E&I/ECE/इलेक्ट्रिकल/EEE/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

पगार
ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 70 हजार रुपये ते 1 लाख रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

मेंटेनन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 70 हजार रुपये ते 1 लाख रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

एनएलसी इंडिया लिमिटेड अधिकृत वेबसाइट लिंक –
https://www.nlcindia.in/new_website/index.htm

अधिसूचना –
https://www.nlcindia.in/new_website/careers/03-2024.pdf

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
जर उमेदवारांना वर नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागले. अर्ज भरताना उमेदवारांनी आपली अचूक आणि संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदभरतीची माहिती काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्जात काही चुका राहिल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. नोकरीचे अर्ज २९ एप्रिल २०२४ ते २० मे २०२४ या कालावधीत स्वीकारले जातील.

follow us