‘गरीबाचा मुलगा पंतप्रधान झालेला बघवत नाही’; PM मोदींनी विरोधकांची दुखती नसच दाबली

Pm Narendra Modi News : गरीबाचा मुलगा पंतप्रधान झालेला विरोधकांना बघवत नसल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी विरोधी नेत्यांची दुखती नसच सांगितली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपूरमधील रामटेक मतदारसंघातील (Ramtek Loksabha) महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मोदींनी हजेरी लावली. यावेळी आयोजित प्रचारसभेत बोलताना मोदींनी […]

Narendra Modi Nagpur Speech

Narendra Modi Nagpur Speech

Pm Narendra Modi News : गरीबाचा मुलगा पंतप्रधान झालेला विरोधकांना बघवत नसल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी विरोधी नेत्यांची दुखती नसच सांगितली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपूरमधील रामटेक मतदारसंघातील (Ramtek Loksabha) महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मोदींनी हजेरी लावली. यावेळी आयोजित प्रचारसभेत बोलताना मोदींनी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या सर्वच पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

PM मोदींच्या सभेला जाताना मोठी दुर्घटना : आमदार आशिष जैस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात; दोन ठार

पंतप्रधान मोदी म्हणाले, गरिबाचा मुलगा पंतप्रधान बनला तर लोकशाही अन् संविधान धोक्यात दिसू लागलं आहे. इंडिया आघाडी कधीच गरीबांचा विकास पाहु शकत नाही. पाण्यात कितीही काठ्या मारा पाणी दुभंगत नाही. गरीबाच्या मुलावर कितीही हल्ला करा, पण मोदी देशाच्या सेवेपासून मागे हटणार नाही. संविधान बदलणार अशी दिशाभूल इंडिया आघाडी करत आहे. इंडिया आघाडी देशाचे तुकडे करत आहे, कारण त्यांना माहित आहे की, एकजूट झाली तर त्यांचं राजकारण संपेल म्हणूनच ते तुकडे करत असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचं काम इंडिया आघाडी करत असून भारताच्या संस्कृतीवरही निशाणा साधण्याची संधी ते सोडत नसल्याचंही मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.

सांगलीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार : मॅच सोडायला विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांचा नकार

Exit mobile version