Praksha Ambedkar on Vishal Patil : सांगलीचे काँग्रेसचे ( Congress ) इच्छुक उमेदवार विशाल पाटील ( Vishal Patil) आणि यांचे मोठे बंधू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील (Pratik Patil) यांनी आज (10 एप्रिल) अकोलामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर ( Praksha Ambedkar) यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर यांनी विशाल पाटील वंचितकडून लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Ahmednagar News : सुजय विखेंना धमकी देणारा निवृत्ती गाडगेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व ठेवायचं की नाही. हे काँग्रेसने ठरवायला हवं. कारण सांगलीमध्ये शिवसेनेचा काहीच नव्हतं. पण शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. त्यानंतर आज सकाळी माझ्याकडे विशाल पाटील येऊन गेले. या संदर्भात त्यांनी चर्चा केली. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा मी बाळगतो. चर्चा झाली आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे. मात्र मी त्यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही. त्यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू असं मी त्यांना सांगितलं आहे. असं म्हणत आंबेडकरांनी विशाल पाटील वंचितकडून लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
‘मविआ’चा फॉर्म्युला तयार पण, महायुतीत 9 जागांचं दुखणं कायम; कुठे वाढलीय धुसफूस ?
दरम्यान महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील काही जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद झाले होते. यात सांगलीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये प्रचंड ताणाताणी झाली. ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केली. त्यामुळे आमदार विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी थेट दिल्ली गाठून सांगलीची उद्धव ठाकरे यांची मे रोजी सभा जागा सोडू नये, अशी मागणी केंद्रीय नेत्यांकडे केली होती. विश्वजित कदम यांनी मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची आणि नागपूरमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांचीही भेट घेतली होती.