‘मविआ’चा फॉर्म्युला तयार पण, महायुतीत 9 जागांचं दुखणं कायम; कुठे वाढलीय धुसफूस ?
Lok Sabha Election : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मैदान आता तयार झाले आहे. महाविकास आघाडीने (Lok Sabha Elections) काल संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. महायुतीत मात्र धुसफूस जास्त दिसून येत आहे. महायुतीने आतापर्यंत 39 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, असे काही मतदारसंघ आहेत जिथे संतुलन साधताना नेतेमंडळींची पुरती दमछाक झाली आहे. या मतदारसंघात बंडखोरीची भीती नेत्यांना वाटत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग-रत्नागिरी, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पालघर आणि सातारा मतदारसंघात भाजप उमेदवार देईल. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवार घोषित करू शकते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या आहेत. लक्षद्वीपमधील एक जागाही त्यांना मिळणार आहे. बारामती, शिरुर, रायगड, धाराशिव, परभणी आणि लक्षद्वीप या जागा अजित पवार गटाला दिल्याची माहिती आहे.
Lok Sabha नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून मोठी घोषणा !
नाशिक अन् रत्नागिरीत तिढा वाढला
रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक मतदारसंघ यंदा चांगलेच डोकेदुखीचे ठरले आहेत. रत्नागिरीवर भाजप आणि शिंदे गटाने दावा केला आहे तर नाशिकसाठी शिंदे गट आणि अजितदादा गटात रस्सीखेच सुरू आहे. या जागेवर अजित पवार गटाने दावा केल्याने महायुतीत तणाव वाढला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महायुतीला अजूनही उमेदवारांची नावे जाहीर करता आली नाहीत.
असा आहे मविआचा फॉर्म्युला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती , शिरूर, सातारा , भिवंडी ‘ माढा, रावेर आणि अहमदनगर दक्षिण या जागा लढणार आहे. तर शिवसेना जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, हातकणंगले, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई या जागा लढणार आहे.
काँग्रेस पक्ष नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रावेर, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई 17 जागा लढणार आहे.
Loksabha Election : माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला; अर्चना पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं