Sakshi Malik On Brijbhushan singh : महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केलेले भाजपचे विद्यमान खासदार ब्रृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचा पत्ता कट करत भाजपने त्याचे पुत्र करण शरण सिंह यांना उमेदवारी दिली. दरम्यान, यावर आता कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. करण शरण सिंह (Karan Sharan Singh) यांना उमेदवारी मिळाली असली तर बृजभूषणच राज्य करणार असल्याचं साक्षी मलिक म्हणाल्या.
Katrina बनली जागतिक उद्योजिका, दुबईतही लाँच झाला ब्युटी ब्रँड!
भाजपने आज कैसरगंज मतदारसंघातून करण भूषण सिंह यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ब्रजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कट करून भाजपने त्यांच्या मुलाली ही उमेदवारी दिली. त्यानंतर साक्षी मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ब्रृजभूषण यांच्या मुलाला लोकसभेचे तिकीट देणे म्हणजे लोकांची दिशाभूल करण्यासारखे आहे. तोच खऱ्या अर्थाने राज्य करेल. ब्रृजभूषण यांच्या मुलाला तिकीट द्यायचे असते तर केंद्र सरकारने आधी ब्रृजभूषण यांना अटक करून नंतर त्यांच्या मुलाला उमेदवार म्हणून घोषित केले असते. किंवा त्याऐवजी बृजभूषण यांच्या जवळच्या व्यक्तीला मैदानात उतरवता आले असते, पण तसे झाले नाही.
…त्यानंतर फडणवीसांना नमस्कार घालायलाही माणूस राहणार नाही; धंगेकरांचा घणाघात
पुढं बोलता साक्षी म्हणाल्या, आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. पण, आता आता लोकसभा निवडणुका आल्या आहेत. यामध्ये ब्रृजभूषण यांचा मुलगा फक्त डमी उमेदवार आहे. खरी सत्ता ब्रृजभूषणच चालवतील. केवळ लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर ब्रृजभूषण यांनी कुस्ती संघातही तेच केले आणि आपल्या जवळच्यांना डमी बनवून राज्य करत आहेत, असं साक्षी मलिक यांनी सांगितलं.
दरम्यान, करण भूषण यांचा जन्म 13 डिसेंबर 1990 रोजी झाला. करण यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. डबल ट्रॅप नेमबाजीत ते राष्ट्रीय खेळाडू राहिलेले आहेत. गोंडा येथील वडिलांच्या नंदिनी महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. ऑस्ट्रेलियातून व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. सध्या ते उत्तर प्रदेश कुस्तीगीर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
कैसरगंज जागेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे आहे. या जागेवर पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. करण भूषण सिंह हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.